निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक व पत्रकार श्री मुकुंद निघोज कर यांची नुकतीच सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड झाली त्यांना निवडीचे पत्र नुकतेच प्रदेशाध्यक्ष श्री उमेश जी बु-हाडेयांनी श्रीगोंदा येथील समितीच्या कायदेविषयक सल्ला चर्चासत्र व विविध पदाधिकाऱ्यांना दिलेले पदभार पत्र या मध्ये प्रदान करण्यात आले यावेळी मुकुंद निघोज कर यांनी अध्यक्ष साहेब व सराफ सुवर्णकार संरक्षण समिती सर्व पदाधिकारी यांचे जाहीर आभार मानले तसेच सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष यांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन केले यावेळी माननीय आमदार श्रीगोंदा श्री विक्रम सिंह बबनरावजी पाचपुते यांनी सुवर्णकाराच्या सर्व प्रश्नांची मला जाणून ज्याचे जळते त्याला दिसते ज्या सुवर्णकार समाजावर कारण नसताना विविध प्रकारचे केस दाखल करून आरोपीला खोट्या पद्धतीने सुखी होऊन केवळ सामाजिक प्रतिष्ठेपोटी चोराच्या सांगण्यावरून घेतले नसलेल्या सोन्याची रिकवरी द्यावी लागते याबाबत गांभीर्याने विचार करून नुकत्याच माननीय मुख्यमंत्री यांनी केलेल्या जीआर चा कायद्यात रूपांतर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली यावेळी समितीतर्फे विविध प्रश्नावर साधक बादक चर्चा झाली महाराष्ट्रातील सराफ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते विभाग प्रमुख जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख व त्या त्या विभागातील विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . समिती सराफ प्रश्न बाबत नेहमीच निस्वार्थपणे काम करील अशी ग्वाही श्री उमेश जी यांनी दिली कायदेविषयक सल्लागार श्री विनायक जी वेद पाठक यांनी खूप मोलाची माहिती सराफ बांधवांना दिली आहे.
कोणत्याही सराफ पाणी घाबरून न जाता कायदेशीर मार्गाने ही लढाई जिंकता येते असे सांगितले यासाठी आपणाकडे योग्य ते दप्तर ठेवण्याची सूचना केली व त्वरित समितीची संपर्क साधा आम्ही निस्वार्थपणे स्वतःच्या खर्चाने आपल्या प्रश्नाला निश्चितच उभे राहू असे सांगितले समाजातील समाज बांधवांनी सुद्धा याबाबत आपले अनुभव सांगितले जवळजवळ रात्री साडेअकरा पर्यंत हा कार्यक्रम चालला श्रीगोंदा सराफ बांधव तर्फे यावेळी भोजन व इतर सर्व व्यवस्था करण्यात आली होती सर्व समाजातील बांधवांनी याबाबत ऋण व्यक्त केले अशाच प्रकारे अध्यक्ष साहेब व समितीच्या आपण बरोबर राहू असे सांगितले