संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील मांडवे बुद्रुक येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे मांडवे बुद्रुक गावातील शिव मंदिराजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मांडे बुद्रुक येथील शिवमंदिर भक्तनिवासातच मृतदेह आढळून आल्याचा प्रकार आज सकाळी समोर आला आहे. भाऊराव विठ्ठल बाचकर रा. करकवाडी वावरथ जांभळी ता. राहुरी जि. अहिल्यानगर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक आदिनाथ गांधले यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. ठसा तज्ञांचे पथकही दाखल झाले आहेत. पोलिस घटनेचा पंचनामा करत आहे. मात्र भाऊराव बाचकर यांचा खून आहे की घातपात याची कसून चौकशी घारगाव पोलिस करत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चौकशी करणार असल्याचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी सांगितले आहे.