सोनई कृषी कॉलेजच्या कृषिदुतांचे सौंदळ्यात स्वागत करण्यात आले. मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई कृषी महाविद्यालयातील कृषी पदवीच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेवासे तालुक्यातील सौंदाळा गावात दाखल झाले. २४ आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती कृषिदूत देणार आहेत. सौंदाळा येथे कृषिदुतांचे स्वागत सरपंच श्री शरद बाबुराव आरगडे, ग्रामसेवक श्रीमती पिसोटे पी. जी , कृषी सहायक श्री निलेश गणगे यांनी केले. कृषी पदवीच्या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता हा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवणार आहेत. विद्यार्थी गावात जाऊन प्रथम सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना पीक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल माहिती देणार आहेत.
प्राचार्य डॉ. एच. जी. मोरे, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती कृषिदुत भावेश बागुल यांनी दिली. यावेळी कृषिदूत रितेश मराठे ,स्नेहांशू मोहिते, अभिजीत कदम, प्रशांत लगड, साहिल कुंभारे,आदी उपस्थित होते.