पंढरपूर येथील नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून घोषित झाल्याने अनेक जण परिचारक गटाकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करीत असताना सौ वैशाली वाळूजकर हे पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री एडवोकेट सुनील वाळूजकर यांच्या पत्नी असून श्री सुनील वाळूजकर यांचा पंढरपूर शहरामध्ये असणारा प्रचंड दांडगा जनसंपर्क विविध सामाजिक संघटनेमध्ये असणारा सहभाग पंढरपूर शहरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी योगा प्राणायाम मंडळाचे अध्यक्ष या योगा ग्रुप मध्ये जवळ जवळ 52 सदस्य असून त्यांचे असणारे घरगुती ,कौटुंबिक या नात्याची संबंध तसेच पंढरपूर शहरांमध्ये वृक्षप्रेमी या सामाजिक संघटने मार्फत जवळ जवळ दोन हजार वृक्षांची लागवड पंढरपूर शहरामध्ये साहेबांचे मोठे कार्य आहे साहेबांचे पंढरपूर येथील गोल्डन फेसबुक मित्र परिवार, नाथ चौक मित्रपरिवार, बॅडमिंटन ग्रुप अशा अनेक सामाजिक, क्रीडा संघटनेशी यामध्ये साहेबांचा असणारा सहभाग असे अनेक सामाजिक संघटनेमध्ये कार्यरत असताना वैयक्तिक व घरगुती स्वरूपाचे संबंध साहेबांनी निर्माण केलेले आहेत.
नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या राज्य जनरल सेक्रेटरी म्हणून काम करीत असताना संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर नगरपालिकेच्या व राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा व त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम साहेबांनी संघटने मार्फत केलेले आहे.पंढरपूर शहरांमधील कोणतीही व्यक्ती पंढरपूर नगरपालिकेत नगरपालिकेच्या कामानिमित्त गेले असता श्री वाळूजकर साहेब यांना आवर्जून भेटल्याशिवाय जात नसत प्रत्येक नागरिकांशी असणारा सुसंवाद ,स्मित हास्य करून काम मार्गी लावण्याची कौशल्य हे पाहून अनेकांच्या मनात आदर असून पंढरपूर शहरातील अनेकांच्या मनामध्ये साहेबांच्या नगराध्यक्ष पदा बद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिसून येत आहेत एकंदरीत अनेकांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी परिचारक गटाकडून सौ वाळूजकर वहिनींनाच मिळावी अशी भावना व्यक्त करीत आहेत पंढरपूर शहरातील अनेक नागरिक, व्यापारी वर्ग सर्व जाती धर्मातील नेत्यांशी व जनतेशी असणारे साहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध सर्वांना ज्ञात आहेत.विरोधी गटातून जर नगराध्यक्ष पदासाठी मराठा उमेदवार दिल्यास परिचारात गटातून टक्कर देणारा, दांडगा जनसंपर्क असणारा उमेदवार म्हणून सौ वैशाली वाळूजकर यांचा परिचारक गटाकडून विचार केला जात आहे श्री वाळूजकर साहेबांचे मागासवर्गीय समाजाशी असणारे हित संबंध ,ओबीसी समाजाशी असणारे संबंध सर्व जाती-धर्माला घेऊन सोबत जाणारी व्यक्ती म्हणून सर्वांना परिचित असणारी व्यक्ती तसेच व्यापारी वर्गात सुद्धा उमेदवारीबद्दल चर्चा आहे अनेक व्यापारी वर्ग आपल्या आतल्या गोट्यातून परिचारक गटातील नेत्यांशी सौ वाळूजकर यांच्या उमेदवारी संदर्भात शिफारस करीत आहेत त्यामुळे एकंदरीत सौ वैशाली वाळूजकर यांचे सद्यस्थितीत परिचारक गटांकडे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.