शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा येथे सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून कायदेविषयक असला तसेच विविध पदावरील सुवर्णकार समाजातील पद वाटप कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये श्रीगोंदा मतदार संघाचे आमदार माननीय विक्रम सिंह बबनराव पाचपुते साहेब यांचे मार्गदर्शन लाभले त्यांचे बंधू प्रताप सिंह पाचपुते साहेब उपस्थित होते सुवर्णकार समाजाला मार्गदर्शन करताना उमेश जी बोराडे यांनी मोलाचे असे मार्गदर्शन केले महाराष्ट्रातील विविध भागातून सर्व सुवर्णकार समाज उपस्थित होता यावेळी निघोज येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच विविध वृत्तपत्राचे पत्रकार निघोज येथील मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे प्रसिद्धीप्रमुख श्री मुकुंद निघोज कर यांची अहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली व तसे त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन सराफ सुवर्णकार समाज समितीतर्फे एडवोकेट विशाल जी पाठक यांनी केली समितीतील पदाधिकाऱ्यांनी तसेच समाज बांधवांनी आपापली व्यथा येणाऱ्या व्यवसायातील अडचणी यामध्ये मांडल्या त्या अडचणीवर निश्चितच सराफ सुवर्णकार संरक्षण समिती निस्वार्थपणे काम करील अशी ग्वाही उमेश जी बोराडे यांनी दिली .
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये शिरूर तालुकाप्रमुख लोळगे साहेब यांची उपस्थिती होती श्रीगोंदा तालुक्यातील सराफ असोसिएशन मध्ये कार्यरत असलेले सर्व सराफ यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते त्यांनी समाज बांधवांसाठी भोजन व कार्यक्रमाची व्यवस्था अतिशय चोखपणे पार पाडली त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.