कामोठे रहिवासी सामाजिक सेवा संस्था, ओम शिव शंकर सेवा मंडळ व जय हरि महिला मंडळ कामोठे संस्थापक अध्यक्ष पोपटशेट आवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते व कामोठे येथील व्यवसायीक सुरेशशेठ ढवण यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त भागातील बिड व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरातील जनतेसाठी कामोठे येथील अहिल्या नगर,पुणे व मुंबई जिल्ह्यातील जनतेने तब्बल दोन गाड्या जिवणावश्यक वस्तू पाठवून प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन जनतेला धीर देत जिवणावश्यक वस्तूंचे वाटप करीत मोठा आधार दिला आहे.सहा लाख रुपये वस्तूंचे वाटप या परिसरातील जनतेला केल्याने या भागातील जनतेने या मंडळाला धन्यवाद व्यक्त करीत तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले असून या नैसर्गिक आप्पतीने होत्याचे नव्हते झाले असून तुमच्या आधाराने आम्ही पुन्हा एकदा उभे राहणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पोपटशेट आवारी, सुरेशशेठ ढवण, सुवर्णा वाळुंज, वर्षा चौधरी, प्रमिला आहेर,गीता उंडे, रंजना ढवण, प्रिती खिलारी, संजना वाघमारे, सुप्रिया माने, सुरेखा गुंजाळ, संगिता पवार, पुष्पा पोटे, उषा आवारी, साबळे ताई, सत्रे ताई, सुजाता चेडे, मनिषा वनवे, शारदा तोंडे, विनंती आंधळे, रंजना शिंदे, लता मोरे, ज्ञानेश्वर सत्रे, शोभा डेरे, ज्योती शिकारे, मंगल आवारी, शुभांगी कड,सुनिता वाबळे, रोहिणी डेरे, जाधव ताई, वनिता वाबळे, पल्लवी आवारी या महिला भगीनींनी कामोठे परिसरात फिरुन या जिवणावश्यक वस्तू गोळा केल्या तसेच त्यांचे पॅकिंग तयार केले. मंडळाचे कार्यकर्ते दादाभाऊ वाळुंज, संदीप पोटे, योगेश चौगुले, अनिल पोटे,रवि बाहोत यांनी यासाठी मदत केली . पोपटशेठ आवारी, सुरेशशेठ ढवण, आत्माराम आरोटे, बाबाजी ढोमे या सर्वांनी बीड व शेवगाव येथे जाऊन या वस्तू गरजूंपर्यंत पोहोच केल्या.
मंडळाचे अध्यक्ष पोपटराव आवारी व सुरेशशेठ ढवण यांनी सांगितले की शेवगाव व बीड येथे नैसर्गिक आप्पतीने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. मात्र आमच्या मंडळाने आजपर्यंत सामाजिक कामांच्या माध्यमातून सातत्याने गोरगरीब गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे. ज्यावेळी ही आपत्ती या लोकांवर कोसळली त्याचवेळी अंगावर काटा आला एवढा दुखदायक प्रसंग हा होता. मंडळाच्या महिला भगीनी व पदाधिकारी व सदस्य यांनी तातडीने मदत जमा करुन गरजूंना या वस्तूंचे वाटप केले. हीच माणूसकीची भावना सर्वांनी जपण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.