Homeताज्या घडामोडीरेखाकला परीक्षेत खडकवाडी (ता.पारनेर) येथील बबनराव नारायण ढोकळे संचालित आदर्श इंग्लिश स्कूलचे यश:१०० टक्के निकाल; श्रावणी निवडुंगेला ‘ए’ ग्रेड
रेखाकला परीक्षेत खडकवाडी (ता.पारनेर) येथील बबनराव नारायण ढोकळे संचालित आदर्श इंग्लिश स्कूलचे यश:१०० टक्के निकाल; श्रावणी निवडुंगेला ‘ए’ ग्रेड
खडकवाडी (ता. पारनेर) येथील बबनराव नारायण ढोकळे संचालित आदर्श इंग्लिश मीडिअम स्कूलने इंटरमिजीएट व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. म हाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत शाळेचे १९ विद्यार्थी इंटरमिजीएट तर १६ विद्यार्थी एलिमेंटरीसाठी प्रविष्ट झाले होते. एलिमेंटरी परीक्षेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. श्रावणी दादाभाऊ निवडुंगे हिने ‘ए’ ग्रेडसह विशेष प्राविण्य मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या यशामळे शाळेच्या यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. इतर विद्यार्थ्यांनीही समाधानकारक व कौतुकास्पद कामगिरी केली. शाळेचे संस्थापक डॉ. किशोर ढोकळे व प्राचार्य अनिल ढोकळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व संस्थेचे प्रोत्साहन लाभल्यामुळे हे यश मि ळाल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या आदर्श इंग्लिश मीडिअम स्कूलने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली असून हे यश शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचे द्योतक असल्याचे मानले जात आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षेत १०० टक्के यश मिळवले, याचा आम्हाला अभिमान वाटतो. विशेषतः श्रावणी निवडुंगे हिने ‘ए’ ग्रेड मिळवले, याचा आनंद आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाने हे यश शक्य झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन !