पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर
जिल्हा परिषद गट व गण आरक्षीत झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची पुर्वतयारीसाठी ईच्छुक उमेदवारांनी सुरू केली असून निघोज जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच निघोज पंचायत समिती गण सर्वसाधारण, अळकुटी गण महिला सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने सर्वांनाच सोयीचे झाले असल्याने निवडणुकीची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू झाली असून दिवाळीनंतर जरी निवडणुकीची घोषणा होणार असली तरी दिवाळीत मात्र प्रचाराची आतषबाजी पाहावयास मिळणार असून ईच्छुक उमेदवारांचा खर्च मात्र दिवाळीत सुरू होणार असल्याने मतदारांचा दिवाळीचा गोडवा यावर्षी जास्त वाढेल अशीच चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा परिषद अळकुटी – निघोज गट हा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग झाल्याने या ठिकाणी कुणीही निवडणूक लढू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.उबाठाचे उमेदवार डॉ भास्करराव शिरोळे हे गेली काही वर्षांपासून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत असले तरी त्यांना उमेदवारीने हुलकावणी दिल्याने या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, उबाठा शिवसेना हे पक्ष एकत्र युतीमध्ये असल्याने आज तरी डॉ शिरोळे हे या निघोज गटांसाठी महाविकास आघाडीचे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार ठरणार आहेत. महायुतीकडून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ हे जिल्हा परिषद निवडणुकीत ईच्छुक असून त्यांचीही जोरदार तयारी सुरू असून या जिल्हा परिषद गटात शिवसेना उबाठा गटाच्या अळकुटी गावच्या सरपंच डॉ. कोमलताई भंडारी या सुद्धा ईच्छुक असून डॉ.शिरोळे हे आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे असा त्यांचा दावा आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सुधामतीताई कवाद या जिल्हा परिषद निवडणुकीत ईच्छुक आहेत त्यांनीही लोकसंपर्क सुरू केला आहे. मात्र ही जागा ओबीसी राखीव आहे महिलेसाठी असती तर पक्षश्रेष्ठींनी कवाद यांच्या उमेदवारीचा विचार केला असता आत्ता मात्र कवाद यांच्या उमेदवारीचा विचार होण्याची शक्यता कमी आहे.
मात्र पक्षश्रेष्ठी यामध्ये काहीतरी मध्यस्थी करतील अशी शक्यता असल्याने या जिल्हा परिषद गटात डॉ. शिरोळे विरुद्ध सचिन पाटील वराळ अशी सरळ लढत होण्याची शक्यता असल्याने दोन्ही उमेदवार तुल्यबळ असल्याने लढत काटा लढत होईल अशीच चर्चा या जिल्हा परिषद गटात सुरू आहे. पंचायत समिती निघोज गण हा सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. याठिकाणी खासदार नीलेश लंके यांचे कटृर समर्थक माजी सरपंच ठकारामशेठ लंके हे ईच्छक असले तरी या जागेसाठी खासदार लंके यांचे ज्येष्ठ समर्थक माजी उपसभापती व समता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी खंडूजी भुकन तसेच खासदार नीलेश लंके यांचे कटृर समर्थक शिवाजीराव लंके हे या जागेसाठी ईच्छुक असून त्यांना लोकआग्रहास्तव मागणी असल्याने ते या जागेसाठी प्रमुख दावेदार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.
शिवाजीराव लंके यांच्या साठी लोकआग्रारहास्तव आहेच. मात्र खासदार लंके हे सुद्धा शिवाजीराव लंके यांच्यासाठी अनुकूल असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्ते व्यक्त करीत आहे.
ळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे समर्थक पंकज कारखिले याची उमेदवारी फायनल झाली असून पंचायत समिती गणात त्यांनी लोकसंपर्क सुरू केला आहे. शिवबा संघटनेने संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे तालुका युवा प्रमुख अनिल शेटे यांनी सुद्धा उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली असून महाविकासआघाडीची युती झाल्यास लंके की शेटे की भुकन यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे. याच गणात शेतकऱ्यांचे युवा नेतृत्व रुपेश ढवण हे अपक्ष उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. कांदा आंदोलन माध्यमातून ढवण यांचा संपर्क मोठा आहे. ढवण हे लोकसभा निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ सक्रिय होते. मात्र विधानसभा निवडणुकीत ते तटस्थ होते. त्यानंतर ढवण यांनी कांदा आंदोलन उपोषण सोडवीण्यासाठी माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची व आमदार काशिनाथ दाते यांची मदत घेतल्याने खासदार लंके गटाकडून त्यांनी फारकत घेतल्याची चर्चा सुरू झाली. सध्या मात्र ते अपक्ष निवडणूक लढवीण्याच्या तयारीत असून त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे. अशाप्रकारे निघोज पंचायत समिती गणात जवळपास पाच ते सहा उमेदवार ईच्छुक आहेत.पंचायत समीती अळकुटी गण हा सर्वसाधारण महिला राखीव झाला असून
अर्चना बाळासाहेब पुंडे महाविकास आघाडी, प्रमिला खंडूशेड म्हस्के ( अपक्ष ) जानवी भास्करराव उचाळे महायुती अशाप्रकारे तीन उमेदवार आज जरी ईच्छुक असले तरी यामध्ये ईच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटावर आज मितीला जिल्हा परिषदचे माजी सभापती मधुकर उचाळे यांचे राजकीय वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. गेली पंचवीस वर्षांपासून ते राजकारणात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सभापती म्हणून उचाळे यांनी अतिशय कार्यक्षमपणे विकासकामे केल्याने आजही ते कोणत्याही निवडणुकीमध्ये ईच्छुक नसले तरी राजकीय वर्चस्व मात्र अबाधित आहे. सध्यासर्वच पक्षांशी निगडित असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार कोण द्यायचा यासाठी नेतेमंडळी त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय उमेदवारी निश्चित करणार नाहीत अशी परिस्थिती आहे. गेली अनेक वर्षांपासून उचाळे हे प्रत्येक निवडणुकीत किंग मेकरची भुमिका बजावीत असल्याने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उचाळे यांच्या कोनत्या समर्थकांना उमेदवारी मिळते यावर या निवडणुकीचे समीकरण अवलंबून आहे. कोनता पक्ष कोनत्या प्रबळ उमेदवाराला उमेदवारी देणार व त्या उमेदवाराचा लोकसंग्रह किती आहे. सध्या जनमत काय आहे. संबंधित उमेदवाराने आजपर्यंत समाजकारण, राजकारण यामध्ये सहभागी होऊन किती विकासकामे केली आहेत याचा सारासार विचार करून उद्याची निवडणूक व विजयी समीकरण ठरणार असल्याची चर्चा होत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रामचंद्र महाराज सुपेकर सर यांना लोकआग्रह*.
*निवडणूक लढवून लोकमताचा आदर करणार सेवानिवृत्त प्राचार्य , पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र महाराज सुपेकर यांचे प्रतिपादन
जिल्हा परिषद निवडणूकीसाठी अळकुटी – निघोज जिल्हा परिषद गट ओबीसी पुरुष असल्याने सर्वच मात्तबर पुढारी सहीत सामाजिक कार्यकर्ते यांच्या आशा अपेक्षा निवडणूक लढवीण्यासाठी वाढल्या असून पठारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त प्राचार्य व प्रवचन किर्तन या माध्यमातून लोकप्रबोधन करणारे रामचंद्र महाराज सुपेकर सर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून आपल्याला अळकुटी – निघोज जिल्हा परिषद गटातून लोकआग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवीणार असल्याची माहिती त्यांनी नगर सह्याद्री बरोबर बोलताना दिली आहे. प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर लग्न, साखरपुडा, दशक्रिया विधी, पुण्यस्मरण, अंत्यविधी तसेच रंजल्या गांजल्या लोकांना सातत्याने मदत करणे. निघोज व परिसरातील पत्रकार संघांच्या सामाजिक कार्याला सातत्याने पाठबळ देऊन उपस्थित राहून मदत करणे अशाप्रकारे सेवानिवृत्त पेन्शन मधून प्रत्येक महिनाकाठी पंचवीस टक्के रक्कम खर्च करणे हा त्यांचा सेवानिवृत्त कार्यक्रमात संकल्प केला होता तो त्यांनी आजपर्यंत निभावला आहे. गेली पाच ते सहा वर्षात विविध कार्यक्रम माध्यमातून लोकसंपर्क एवढा वाढला असून सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सातत्याने १६ तास नियमितपणे ते दुचाकीवर प्रवास करीत लोकांच्या सुखादुखात सातत्याने सहभागी होत असतात. गेली दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूक आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर सर तुम्ही निवडुकीला उभे राहा विजय तुमचाच आहे असे मोबाईल चोवीस तास खणखणत असून लोकआग्रह होत असल्याने आपल्याला निवडणूक लढवायची अशी माहिती त्यांनी दिली आहे. पठारवाडी हे गाव गेली अनेक वर्षे कान्हुरपठार जिल्हा परिषद गटात होते ते यावेळी अळकुटी – निघोज गटात आले आहे. त्यातच पठारवाडी हे गाव पुर्वी निघोज ग्रुप ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट होते अशाप्रकारे पंधरा हजार मतांची ही दोन गावे म्हणजे हमखास बालेकिल्ला असल्याची माहिती त्यांच्या समर्थक कार्यकर्ते यांनी दिली असून आजपर्यंत धार्मिक क्षेत्रात सर्वाधिक योगदान देऊन धार्मिक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे सुपेकर सर यांना लोकवर्गणीतून आम्ही सहकार्य करणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थक कार्यकर्ते यांनी दिली आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत शिक्षक ते प्राचार्य म्हणून कार्यरत असताना अहिल्या नगर जिल्ह्यातील बहुतांश विद्यालय महाविद्यालयात कार्यरत असताना आपला संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हजारो कुटुंबाशी आपला स्नेहभाव आजही टिकून असल्याने एकही पैसा व्यर्थ खर्च न होता आपण ही निवडणूक एक आगळे वेगळे उदाहरण म्हणून लढवणार असून आपल्या या निवडणूक लढवीण्याच्या निर्णयाने आपल्यावर सातत्याने प्रेम करणाऱ्या जनतेचा आनंद द्विगुणित झाला आहे
( सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर सर )