राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क: अकोले

अकोले ( प्रतिनिधी ) केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तीसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबीराचे आयोजन आज रविवारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे जल संपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली अकोले चे आमदार डॉ किरण लहामटे व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात व पाय बसवणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप जागेवरच साहित्य वाटपाचे नियोजन या शिबीराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
