राज्यातील सरकारी शाळा शेवटच्या घटका मोजत असताना बुलढाण्यातील एका सरपंच बाईंनी धाडसी निर्णय घेतलाय. त्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतीये.महाराष्ट्रातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घट होत असल्याचं चित्र समोर येत आहे. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत असल्याने मराठी शाळांना घरघर लागली आहे. काही महानगरपालिकेच्या सरासरी आकडेवारीनुसार, २००५ मध्ये २१ मराठी प्राथमिक शाळा होत्या, त्या आता केवळ १२ उरल्या आहेत. आर्थिक पाहणी अहवालानुसार, महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणातील पटसंख्या एक कोटी ६७ लाखांवरून एक कोटी ५४ लाखांवर आली आहे.
ज्यात मुलींची संख्या १६ टक्क्यांनी घटली आहे. अशातच आता बुलढाण्यातील भडगाव मायंबा या गावांमध्ये सरपंचांनी घेतला धाडसी निर्णय घेतला आहे बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा या गावाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात येत आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षात घटत असल्याचे चित्र आहे खाजगी शाळा मुळे स्पर्धा वाढली आहे ग्रामीण भागातील सरकारी शाळा टिकवण्यासाठी अधिक प्रयत्नाची गरज आहे ग्रामपंचायत चा हा निर्णय पार्श्वभूमीवर योग्य दिशेने टाकलेले पाऊल मांनले जाते घरपट्टी सवलतीचा थेट लाभ पालकांना होत आहे आपल्या मुलांना, स्थानिक जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देण्याकरिता प्रेरीत होतील यामुळे गावातील सरकारी शाळेची वाढती शैक्षणिक संख्या , गुणवत्ता, टिकवणं शक्य होईल पाणीपट्टी घरपट्टी माप या ग्रामपंचायतची चर्चा सगळीकडे होत आहे या ग्रामपंचायतीने दाखवलेला मार्ग इतर ग्रामपंचायतीसाठी प्रेरणादायी ठरू शकतो शैक्षणिक बदलण्यासाठी प्रशासनाच्या पुढे गावकऱ्यांनी पाऊल टाकत असल्याचे हे उत्तम उदाहरण या निर्णयामुळे , गावकऱ्यांची जिल्हा परिषद शाळेतील सहभागीता वाढेल व त्यातून शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात चांगलं शिक्षण घेण्याची संधी मिळेल जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला हा निर्णय या ग्रामपंचायत बुलढाणा जिल्ह्यात सगळीकडे चर्चा होतांना दिसत आहे असाच निर्णय सर्व ग्रामपंचायत ने, घेण्याची गरज अस व्यक्त स्थानिक नागरिकांन कडून होतांना दिसत आहे