मेहकर तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणारे गाव म्हणजे देऊळगाव साखरशा येथे दिनांक 15.7.2025. पासून जनावरावर लंपी आजाराने थैमान घातले आहे. नव्याने रुजू झालेले डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी देऊळगाव साखरशा येथील पदभार सांभाळला तोच जनावराची रात्रंदिवस काळजी घेत. लंपी आजार आटोक्यात आणला. डॉक्टर प्रवीण शिंदे हे अतिशय काळजीवाहू डॉक्टर आहे. हे देऊळगाव साखरशाला लाभले आहे. आतापर्यंत जेवढे डॉक्टर देऊळगाव साखरशाला आले आहेत त्यातील हा एक काळजीवाहू डॉक्टर प्रवीण शिंदे यांनी लं पी हा आजार ताबडतोब आटोक्यात आणला आहे.
प्रवीण शिंदे हे बाहेर गावाहून सकाळी सात वाजता देऊळगाव साखरशा येथे दवाखान्यात हजर असता आणि त्यांच्यासोबत वसंता चव्हाण हे त्यांना परि चर असून दोघेजण लोकांच्या गोठ्यावर जाऊन जनावरांना लसीकरण करून आजाराने लागलेल्या जनावराची अतिशय उत्कृष्ट ट्रीटमेंट जनावरांना देतात. त्याची त्यांची जनावराची बाबतची काळजी पाहून त्यांचे सर्व गावातील नागरिकाकडून कौतुक केल्या जात आहे.