मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते पत्रकार भारत कवितके यांचे ” विठू तू माझ्या साठी का नाही धावला?” हे गाणे युट्यूबवर प्रसारित झाले, गीतकार भारत कवितके यांचे हे गाणे म्हणजे गीतकारांने विठू कडे मांडलेली तक्रार आहे.हे गाणे पी पी म्युझिक समुहाचे निर्माते श्रीराम घडे स्वरातून गाण्यालाआवाज आणि संगीत विकास साळवे यांनी दिला आहे.यापूर्वी गीतकार भारत कवितके यांची आठ गाणी युट्यूबवर प्रसारित होऊन सर्वत्र धुमाकूळ घालत आहेत.रसिकांच्या पसंतीला उतरली आहेत.गीतकार भारत कवितके यांचे मूळ गाव विठू ची पंढरी होय,ते नोकरी निमित्त मुंबई मध्ये स्थायिक झाले.तरीही तर यांचे गावी पंढरपूर ला नेहमी जाणे येणे सुरूच असते.विठ्ठलाची त्यांनी खूप भक्ती केली होती.
पण जीवनात खूपच संघर्ष, संकटे त्यांच्या वाट्याला आली.या गाण्यातून त्यांनी विठ्ठला कडे तक्रार केलेली आहे “.विठू तु सर्वांसाठी धावत जातो,पण माझ्या साठी मात्र तू कधी धावला नाही.इतरांप्रमाणे मी ही विठ्ठलाची भक्ती केली पण मी केलेल्या भक्तीला विठू पावलाच नाही.असे का ? आयुष्य भर मी आसवे गाळत राहिलो, रक्ताळलेल्या, ठेंचाळत पावलांनी चालत राहिलो, स्वप्नाशी लपंडाव खेळत राहिलो, गरिबीशी लढत राहिलो, झुंजत राहिलो,तू मदतीला येईल, तुझ्या वर भैरोसा ठेवला पण तू आलाच नाही, मी गाव सोडला तेव्हा आई आप्पांनी मला आशिर्वाद दिला,मी भरल्या डोळ्यांनी गाव सोडला.आणी नशीब आजमावून घेण्यासाठी मुंबई ला आलो.तिथे सुध्दा माझी संकटांनी पाठ सोडली नाही, मनात वाटत होतें तुझ्या कृपेने सर्वांचे भले होते तसंच माझेही होईल,पण तसे झाले नाही, तूझी माझ्या वर कृपा झालीच नाही,मी मुंबई सारख्या शहरात येऊन नवीन डाव मांडला, अभंगातून सारे तुझे गोडवे गातात, तुला मायाळू, कृपाळू संबोधतात, आषाढी कार्तिकीला तुझ्या कडे धाव घेतात, तुझ्या दर्शनाने धन्य धन्य होऊन जातात,पण मला प्रश्न पडला की सर्वांसाठी धावणारा माझ्या मदतीला का नाही धावला,? पंढरपूर असो वा मुंबई सर्व ठिकाणी संघर्षच माझ्या नशिबी होता,चौहोबाजूनी माझा तिरस्कारच होता, मला माझे जीवन म्हणजे वेदनेचा शापच वाटत होता.अंधारात उजेडाचा नुसताच भास होता,माझा जीव कधीच सुखाने जगला नाही, गीतकार भारत कवितके यांनी विठ्ठला कडे केलेल्या रितसर तक्रारी ऐकून रसिकांची मने हळहळल्या शिवाय राहत नाहीत, एखाद्याच्या जीवनात एवढा संघर्ष असावा यावर विश्वास बसत नाही,पण गीतकार भारत कवितके यांनी आपल्या गाण्यातून स्वतः च्या जीवनातील वास्तव मांडलेले आहे,