अहिल्यानगर प्रतिनिधी: सागर कासार

गुंडेगाव प्रतिनिधी :- नगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वाळकी – चिचोंडी पाटील मंडळ कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी गुंडेगाव येथील माजी उपसरपंच संतोष भापकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . ही नियुक्ती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष गहिननाथ दरेकर यांनी भापकर यांना औपचारिकरित्या नियुक्तीपत्र प्रदान केले.

भाजपच्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.माजी उपसरपंच संतोष भापकर यांच्यावर पक्षाने सोपवलेली ही जबाबदारी त्यांच्या नेतृत्वगुण व कार्यकर्तृत्वाची पावती आहे.
संतोष भापकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वाळकी – चिचोंडी पाटील मंडळासह संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.
