१ आगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोक क्रांतीचे जनक अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला.जन्मापासून ते मरणापर्यंत त्यांना संघर्षच करावा लागला.संघर्षा विना त्यांचे जीवन नव्हते.पोवाड्यातून,लावणीतून विचार मांडताना मर्यादा आड येत असल्याने त्यांनी आपले विचार कथा, नाटक, कांदबरी यातून मांडण्यास सुरुवात केली.सर्वसामान्याना जगण्यासाठी संघर्घाची जाणीव करून दिली.विशेष करुन त्यांनी कामगार वर्गाला एकत्रित करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी केली.त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई झाली.हे केवळ अण्णाभाऊ साठे मुळेच.अण्णाभाऊ साठे विद्रोही लेखक म्हणून मानले जाऊ लागले.मार्क्सवादा कडून आंबेडकर वादा कडे आल्यावर खरे अण्णा भाऊ साठे लोकांना कळले.तेव्हा त्यांच्या आंबेडकर वादी साहित्याची दखल दलीत वर्गाने घेतली.अण्णाभाऊ साठे यांनी १९४४ ४५ ला कम्युनिस्ट कला पथक स्थापन केले, त्या वेळी ते कम्युनिस्टच्या कोणत्याही पदावर नव्हते.१९५७ ५८ दलीत साहित्य संमेलनात स्वागत अध्यक्ष असताना म्हणाले होते की,” पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर बसली नसून कष्टकरी दिन दलीत व श्रमिकांच्या तळहातावर तरंगत आहे,गार्गी, लेनिन,कार्ल मार्क्स, आणि आंबेडकर यांच्या विचारांचे धगधगते निखारे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य होय.सर्व सामान्यांना पोटाची भूक भागविण्यासाठी स्वाभिमान अण्णा भाऊ साठे यांनी जागृत केला.सामान्याना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर खरा संघर्ष केला.अण्णाभाऊ साठे खूप कमी शिकलेले होते पण त्यांची साहित्य संपदा विपुल होती, त्यांच्या साहित्याचा विषय समाज परिवर्तनाचा असायचा लोकनाट्य, नाटक, चित्रपट कथा, कांदबरी, कथा संग्रह प्रचंड प्रमाणात त्यांनी साहित्य निर्माण केले.प्रत्येक कांदबरी जन मनाचा ठाव घेते,माकडाचा माळ, वारणेचा वाघ, फकिरा, मास्टर, या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या.व चित्रपट ही निघाले.अण्णाभाऊ साठे यांनी त्या काळात लिहीलेली मुंबई ची लावणी प्रचंड गाजली.या लावणीत त्यांनी श्रीमंती व गरिबी यांची विसंगती टिपली आहे.
” मुंबईत उंचावरी मलबार हिल,इंद्रापुरी// कुबेराची वस्ती तिथे सूख भोगती, परळात राहणारे रात दिवस राबणारे/ मिळेल ते खाऊन घाम गाळती/ ग्रॅड रोड, गोखले रोड असे कितीतरी रोड इथे नाही गणती/ अरबी समुद्राचा वेढा हिच्या भोवती/ आगीत गाडी, मोटार गाडी, विमान घेते उंच उडी,टांग्याची घोडी मरती रस्त्यावर,हात गाडी हमालाची भारी गडबड खटार्याची, धडपड इथे वाहतुकीची रीघ लागती/ तर दसरी लावणी कामगार वर्गात खूप लोकप्रिय झाली, मनोरंजक ठरली. ” माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली/ ओतीव बांधा,रंग गव्हाला,कोर चंद्राची, उदात्त गुणांची, मोठ्या मनाची,सिता माझी रामाची, हसून बोलायची,मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती,घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची,काडी दवन्याची, रेखीव भुवया,कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिर्याची, काठी आंधळ्याची, तशी माझी गरिबांची मैना, मैना रत्नांची खाण,माझा जीव की प्राण,नसे सुखाला वाण, तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होतीया काहिली./ गरिबीने ताटातूट केली आम्हां दोघांची, झाली तयारी मुम्बैला जाण्याची , वेळ होती पहाटेची,बांधा बांध झाली तुकड्याची, घालवीत निघाली मला,माझी मैना चांदणी शुक्राची,गावदरीला येताच कळी कोमेजली, तिच्या मनाची शिकस्त केली,मी तीला हसविण्याची खैरात केली,/ १८ जुलै १९६९ ला अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले.आपल्या मानधनासाठी वणवण फिरुन घरी आले.तेव्हा ते खूप नाराज होते, लोक क्रांतीचे जनक अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम, भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम 8652305700