राहुरी (प्रतिनिधी)-संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जात असताना कर्जाच्या ओझ्याखाली दबला, जगाचा पोशिंदा आज स्वतःच्या कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवण्यास अपयशी ठरत असून याचा फायदा घेत महायुती सरकारने निवडणुकी वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे यासाठी माजीमंत्री बच्चुभाऊ कडु यांनी गेल्या महिन्यात संत तुकडोजी महाराज समाधी मोझरी येथे सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले त्यावेळी सरकारने आश्वासन दिले,परंतु सरकारचा चालबाज पना पाहून पुन्हा बच्चू कडू यांनी ७ जुलै पासून ‘सातबारा कोरा कोरा कोरा’यात्रेला प्रारंभ होणार आहे तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पार्टी पक्ष जात धर्म बाजूला ठेवून बहुजन समाजातील कष्टकरी शेतकरी व दिव्यांगानी आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केले.
पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले राज्य व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या न्यायहक्कांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊं यांच्या नेतृत्वाखाली ‘सातबारा कोरा करा’ ही १३८ किलो मीटरची पदयात्रा ७ जुलै रोजी डॉ.पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पाबळ जिल्हा अमरावती येथुन सुरू होणार आहे.तर महाराष्ट्रात पहिली शेतकरी आत्महत्या झालेले कै.साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या चिलगव्हाण गाव जिल्हा यवतमाळ येथे समारोप होणार आहे,हे सरकार शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेतून दिलेला आहे, तरी या यात्रेला राहुरी तालुक्यातील शेतकरी व दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बच्चुभाऊंच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून घ्यावा अशी विनंती शेतकरी नेते प्रहारचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी तालुक्यातील नागरिकांना केली,