पाच भावंडापैकी एक असलेल्या सुधीर फडके यांना गाण्याचे अतिशय वेड होते.साधारण ते तीन चार वर्षांचे असताना कुणी भिकारी, बैरागी जर गाणे गात असेल तेव्हा अगदी जसेच्या तसे हुबेहूब त्याच आवाजात ते गाणे म्हणत असत.त्याचा स्वर ही चांगला होता.सुधीर फडके अर्थात बाबूजी यांचा जन्म कोल्हापूर येथे २५ जुलै १९१९ मध्ये झाला.सुधीर फडके तिसरीत असताना त्यांची आई क्षयरोगानी वारली.त्यावेळी त्यांचे वय नव वर्षाचे होते.आई वारल्यानंतर घरची परिस्थिती फारच हालाखीची झाली.त्यांच्या वडिलांची वकीली चालेनाशी झाली.घरात उत्पन्न कमी येऊ लागले.घरातील वस्तू हळूहळू गहाण म्हणून बाजारात जाऊ लागल्या.अशा वेळी सुधीर फडके हे त्यांच्या मामाच्या गावी दिवाळीच्या सुट्टीत जमखंडीला गेले होते, त्यावेळी मुंबई मधील प्रख्यात डॉ.भाजेकरांसमोर गाणे गात असताना त्यांनी त्यांचे कौतुक केले.व त्यांना मुंबई ला येण्याचा सल्ला दिला.बाबुराव गोखल्यांच्या महाराष्ट्र संगीत विद्यालया मध्ये त्यांना गाणे शिकण्यासाठी पाठविले.कोणत्याही यशाने गर्विष्ठ होणे,मगरुर होणे व अपयशाने खचून न जाणे ,हे त्यांच्या स्वभावात नव्हते.पडत्या काळात त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या.संकटावर मात करीत राहिले.सुधीर फडके यांना प्रचंड मान सन्मान धन दौलत मिळून त्यांचे पाय मात्र जमिनीवर होते.सुधीर फडके यांचे खरे नाव रामचंद्र फडके असे होते पण कवी व संवाद लेखक न.ना.देशपांडे यांनी ना.सि.फडके यांच्या नव्या कांदबरी तील नायकाचे सुधीर हे नाव फारच आवडले त्यांनी एका कार्यक्रमात रामचंद्र ऐवजी सुधीर फडके हे नामकरण केले,त्यास सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. ” चांदा ची किरणे विरली, प्रीतीच्या माझ्या राजा , वाट किती पाहू रे , वाट किती पाहू रे.”
छुम ,छुम,छुम,छुम,नाच मोरा” ” आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा…” ” उध्दवा अजब तुझे सरकार..,” “एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ” ,” जग हे बंदी शाळा, ” ” संथ वाहते कृष्णामाई” ” दाम करी काम येड्या..” ,”कशी नशीबाने थट्टा आज मांडली ” ” खेळ मांडून भांडून मोडू नको,” ” सखी मंद झाल्या तारका,” ” आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको..”,” देहाची तिजोरी…,” ” पोटा पुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,” अशी सदैव जनात, मनात आठवणीत राहणारी गाणी सुधीर फडके यांनी गायली व अजरामर केली,जीवनाची वास्तवता मांडणारी, तुमच्या आमच्या अनुभवातील गाणी सुधीर फडके यांनी गायली.संगीतबध्द ही केली, गीत रामायण आणि वीर सावरकर ही त्यांची स्वप्ने होती, सुधीर फडके यांचा आवाज स्पष्ट,गोड,हळवा, मृदू , कारुण्य मय , मखमली आवाज होता.सुधीर फडके यांचा आवाज म्हणजे दैवी लिलाच म्हणावे लागेल.२९ जुलै २००२ मध्ये सुधीर फडके यांचे निधन झाले, त्यानिमित्ताने आदरांजली. ” एक वार पंखा वरुन फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात…”