मुंबई वरळी येथे लवकरच माता रमाईच्या स्मृती स्थळावर पत्र्याच्या शेड ऐवजी अष्टकोनी डोम बांधण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार माजी समाज कल्याण मंत्री विजय (भाई) गिरकर यांनी दिली.माता रमाईचे निधन २७ मे १९३५ रोजी झाल्यानंतर मुंबई वरळी येथील स्मशानभूमीत दहन करण्यात आलेले होते.
प.पू.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या वेळी उपस्थित होते.तेथील स्मृती स्थळावर साधी पत्र्याची शेड आहे ती काढून त्या ठिकाणी अष्टकोनी डोम बांधण्यात यावा, याकरिता विजय ( भाई) गिरकर अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन या ठिकाणी अष्टकोनी डोम बांधण्याचे निर्देश मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.विजय ( भाई) गिरकर व मयूर देवळेकर यांनी आयुक्तांना अष्टकोनी डोम आराखडा सादर केला होता.यासाठी विजय (भाई) गिरकर यांनी जी/ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांची भेट घेऊन आयुक्तांना सादर केलेल्या डोमचा आराखड्या नुसार लवकरच काम सुरू करण्याचे सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांनी आश्वासन दिले.याप्रसंगी मनपा सहायक अभियंता राजेशकुमार यादव,मयुर देवळेकर, अमोल साळुंके, सिध्दार्थ खंडागळे,प्रकाश डोळस आदी उपस्थित होते.