हजारो सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायणास बसण्याचे ‘गुरुमाऊलींचे’ आवाहन: पारनेरमध्ये जय्यत तयारी
पारनेर (प्रतिनिधी): मुकुंद निघोजकर
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर संचलित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पारनेरच्या वतीने आगामी ‘श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह’ (८ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६) च्या निमित्ताने जनजागृती करण्यासाठी आणि स्वामी सेवेचा प्रसार करण्यासाठी रविवार, दिनांक 5 एप्रिल २०२६ रोजी पारनेर नगरीत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प.पू. गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि आदरणीय गुरुपुत्र श्री चंद्रकांतदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. दुपारी ३:३० ते सायंकाळी ६:०० या वेळेत निघणाऱ्या या पालखी सोहळ्यात तालुक्यातील सर्व साप्ताहिक केंद्रांतील सेवेकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्याच्या दिवशीच, म्हणजे 5 एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते दुपारी ४:३० या वेळेत पारनेर तालुक्यातील पळवे साप्ताहिक केंद्रात ‘श्री स्वामी समर्थ’ नावाचा होमहवन जपयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पारनेर आणि शिरूर तालुक्यातील जास्तीत जास्त भाविकांनी या उच्च कोटीच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन पळवे केंद्र प्रतिनिधींनी केले आहे.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अहिल्यानगर दक्षिण विभाग प्रतिनिधी श्री. काशिनाथ फंड सर, तालुका प्रतिनिधी श्री. भांड सर, श्री. नामदेव औटी सर, श्री. रामभाऊ गाडेकर, श्री. मच्छिंद्रशेठ मते, श्री. शाहूराव औटी सर, श्री. राजू कडू, पोटे मॅडम, श्री. विलास कटारिया, श्री. शिरीष साबळे, श्री. अमोल औटी, हरदे काकू, डोळ काकू, रोडे मावशी तसेच पारनेर केंद्र प्रतिनिधी रेखाताई औटी व सर्व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले आहेत.