इयत्ता पहिलीच्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व इयत्ता चौथीचा निरोप समारंभ करण्यासाठी आपल्या बांडेवाडीतील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवार दि.०४/०४/२०२६ रोजी ‘प्रवेशोत्सव (पहिले पाऊल) साजरा करण्यात आला. यामध्ये फुलांची सजावट, अक्षता लावून बैलगाडीतून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांच्या पहिल्या दिवसाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना शालेय साहित्याचे वाटप, खाऊ आणि भेटवस्तू देऊन शाळेचा पहिला दिवस आनंददायी बनवला व इयत्ता चौथीचा निरोप समारंभ घेण्यात आला. प्राथमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक भावनिक आणि महत्त्वाचा सोहळा असतो. यात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक, आठवणींची उजळणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करणारा झाला. इयत्ता चौथी निरोप समारंभ कार्यक्रमाची रूपरेषा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सबिया शेख यांनी सांगितले तर सहशिक्षक श्री. शेख गुरुजी यांनी मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती दिली.अंगणवाडी सेविका सौ.सुनंदा पोंदकुले व मदतनीस सौ.उर्मिला बांडे यांनी नियोजन केले. दीपप्रज्वलनाने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात ४ वर्षांतील अनुभव व आठवणी सांगितल्या.शिक्षक/पालकांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा आणि मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले.आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
महत्त्वाचे संदेश: विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने नवीन आव्हानांना सामोरे जावे. शाळेतील मैत्री आणि शिक्षकांचे प्रेम नेहमी लक्षात ठवावे हा सोहळा मुलांच्या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाचा समारोप आणि नवीन प्रवासाची सुरुवात करतो. बांडेवाडीतील सर्व ग्रामस्थ, पालक,माझी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.