मनोरंजन, सांस्कृतिक व कुस्त्याच्या हगामा व महिला साठी होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न
अहिल्यानगर प्रतिनिधी::संजय ठोंबरे
अहिल्यानगर आठवड (ता. नगर) येदील ग्रामदेवता म्हसोबा महाराज यात्रोत्सव दिनांक 7 और 8 एप्रिलला सरपंच सविता सुनिता लगड यांच्या नेतृत्वाखाली मोठया आनंदात व उत्साहात साजरा झाला . दोन दिवस विभिन्न धार्मिक, सांस्कृतिक और पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजनात हा उत्सव संपन्न झाला. दि. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या जलाचा म्हसोबा महाराज मूर्तिस महाअभिषेक करण्यात आला . कावड यात्रेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महापूजा होऊन दिवसभर शेरणी वाटप करत भाविकांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती . सायंकाळी ८ वाजता म्हसोबा महाराज पालखी छबीना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली . रात्री ११ वाजता शिवकन्या बडे नगरकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम झाला . दि. ८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला . .त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीचा महाप्रसादाचे आयोजन केले होते . दुपारी ३ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित करण्यात आला होता . यात अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील नामवंत पहिलवान हजेरी लावली . पंच म्हणून अतुल लगड सर , अशोक चोभे, बापुसाहेब गुंजाळ, भगवान लगड, बाळासाहेब लोखंड, विष्णु घाणमोडे यांनी काम पाहिले . विजेत्या मल्लांना बक्षिसे बिदागी वाटप नियोजन उपसरपंच शंकर मोरे , माजी उपसरपंच तुकाराम दाताळ , बापूराव चोभे , अक्षय लगड यांनी पार पाडले. रात्री ९ वाजला महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला पुण्याचे किरण पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन मागील वर्षीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त प्रिती मोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले . या कार्यक्रमात गावातील महिला आणि यात्रेसाठी उपस्थित पाहुण्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . गावातील काही दात्यांनी या कार्यक्रमात विजेत्यांना दिलेल्या गृहउपायोगी वस्तु बक्षिसाचे प्रायोजकत्व करून सहकार्य केले . होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन माजी उपसरपंच बी एस लगड यांनी केले . या वर्षी या कार्यक्रमात आश्लेशा कोरडे यांनी प्रथम येत पैठणी आणि मिक्सर प्राप्त करून विजेता पद पटकवले .
यात्रोत्सव यशस्वीरीत्या आयोजन करण्यासाठी यात्रा कमेटीने विशेष परिश्रम घेताल.दोन्ही दिवस यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे चिचोंडी पाटील बीटचे पोलिस हवालदार शैलेश सरोदे आणि पोलिस हवालदार महेश भवर यांना चोख बंदोबस्त ठेवला .