लहान लहान मुले अंगणवाडी मध्ये जात असतात त्यांच्या जीवाला मोठा धोका होण्याची शक्यता?
पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे तास गावातील अंगणवाडी व्यवस्थित न झाल्यामुळे पडायला लागली आहे अंगणवाडी मध्ये लहान लहान मुले जात असतात त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
पारनेर तालुका हा सर्व गुण संपन्न तालुका आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये ही सर्वात मोठी घटना सध्या पाहायला मिळत आहे अंगणवाडी हे मुलांचं भविष्य घडवत असतं आणि जर ही अंगणवाडी अचानक पडली किंवा कोसळली तर छोट्या मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी ग्रामस्थांनी सांगितले आहे की ही अंगणवाडी दुरुस्त करावी कारण अंगणवाडी चे काम व्यवस्थित झाले नाही त्यामुळे अंगणवाडी भिंतीला छिद्र पडले आहे कधीही अचानक ही अंगणवाडी कोसळू शकते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीर्व संताप पाहायला मिळाला.