Homeताज्या घडामोडीउबाठा शिवसेना महिला तालुकाप्रमुख प्रियंकाताई खिलारी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते व सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वात केला प्रवेश, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पदी केली नियुक्ती…
उबाठा शिवसेना महिला तालुकाप्रमुख प्रियंकाताई खिलारी यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश, शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या हस्ते व सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वात केला प्रवेश, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख पदी केली नियुक्ती…
आज पारनेर येथे शिवसेना महाराष्ट्र राज्याचे सचिव अहिल्यानगर संपर्क प्रमुख श्री.रामजी रेपाळे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली येणाऱ्या निवडणुकी संदर्भात शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न झाली.पारनेर तालुका शिवसेना वतीने सुजित झावरे पाटील सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते संपर्क प्रमुख रामजी रेपाळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सुजित झावरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. तालुक्यातील अनेक जुने नवीन निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षाची जबाबदारी देण्यात आली.
यावेळी मा. रेपाळे साहेब यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीचे पत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संदेश कार्ले, रामदास भोर, संजीव भोर, अजित दळवी, पारनेर तालुका प्रमुख अरुणराव ठाणगे, नितीन शेळके, स्वप्निल घुले, महिला तालुका प्रमुख कोमलताई भंडारी, खंडूजी भुकन साहेब व पारनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.