सुजित झावरे यांनी वेधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष.
राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क: पारनेर
पारनेर – पठार भागा खालील गावे पठारावरील भागाला जोडणारा महत्त्व पूर्ण असणारा देवीभोयरे फाटा ते पाडळी दर्या कान्हुर पठार रस्ता व घाटाची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून पाडळी दर्या घाटात तर दोन ठिकाणी पावसामुळे रस्ता खचला असून त्याचे वार्तांकन जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्रांनी केले आहे , पण या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास ना राजकीय पुढाऱ्यांना वेळ , ना शासकीय अधिकाऱ्यांना वेळ . सर्वांनी अक्षरशः टोलवा टोलवी चालविली असून भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली असून अशी दुर्देवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा गंभीर प्रश्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी उपस्थित केला आहे .
या आठवड्यात जिल्हयातील सर्वच वर्तमानपत्रांनी वार्तांकना व्दारे पाडळी दर्या घाटाची दयनिय अवस्था छायाचित्राव्दारे समाज माध्यमांव्दारे समाजापुढे मांडली . या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी अक्षरशः टोलवा टोलवी चालविली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वसईकर म्हणतात की , हा रस्ता आमच्या कडे नाही , तर जिल्हा परिषदे कडे आहे , तर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता , त्यांनी पाडळी दर्या ग्रामपंचायतीला घाटाचे काम करण्याचे पत्र दिले . तर पाडळी दर्या ग्रामपंचायत ही आर्थिक दृष्ट्या सक्षम सक्षम नसल्याने घाटाचा गंभीर प्रश्न कोणी हाताळायचा हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे . जिल्हयातील वर्तमान पत्रांनी आपापल्याने पद्धतीने वार्तांकन करून जबाबदारी प्रामाणिक पार पाडली आहे , तर खा . निलेश लंके , आ . काशिनाथ दाते हे आपापल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असल्याने व राज्यात सत्ताधारी असलेले पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार , भारतीय जनता पक्ष , शिवसेना एकनाथ शिंदे आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार , शिवसेना उद्धव ठाकरे यांचे राजकीय पुढारी , कार्यकर्ते यांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नाही. देवीभोयरे फाटा ते पाडळी दर्या , पिंपरी पठार मार्गे कान्हुर पठार मार्गावरील पिंपळगाव रोठा फाट्यापर्यंत चा १२ किलो मीटर चा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता , असा प्रश्न वाहन चालकांना पडल्याशिवाय राहत नाही , तर नवलचं . आजू बाजू च्या सर्वच गावांची रस्ते डांबरीकरणाने जोडली गेली आहेत , अपवाद फक्त पाडळी दर्या चाच रस्ता राहिला आहे .
या खराब रस्त्याने एखादे वाहनाने प्रवास केला की , पुन्हा वाहन चालक या मार्गाने जातच नाही , वाहनाचे ही नुकसान व प्रवाश्यांचे ही शारीरिक नुकसान , देवीभोयरे फाटा परिसर , मोरे वस्ती , पाडळी दर्या , पुढे पिंपरी पठार येथे ही माणसंच राहतात , यांना पक्के डांबरी रस्ते , मजबुती करण व रुंदीकरणा सह करून दिल्यास त्यांना ही मानसिक समाधान मिळून त्यांचा ही प्रवास सुखकर होईल , पण लक्ष कोण देणार ? दुवा कोण घेणार ? हे परमेश्वरालाच ठाऊक , असा उपरोधक सवाल ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी केला आहे.
सुजित झावरे यांनी घाटाच्या संदर्भात घातले लक्ष .
सध्या कोणत्याही पदावर नसलेले परंतु पारनेर तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामांसाठी राज्य शासनाकडून निधी आणण्यात अग्रेसर असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी मात्र पाडळी दर्या घाट व देवी भोयरे फाटा ते पिंपळगाव रोठा फाट्या पर्यंतच्या १२ कि . मी . रस्त्याकडे लक्ष दिले असून त्यांनी याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना . अजित पवार यांचे लक्ष वेधले आहे . त्यांच्या माध्यमातून हा दळणवळणाचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्याचा शब्द ही दिला आहे . ]