याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 28/ 7/2025 रोजी श्री रुपेशजी ढवण युवा नेतृत्व कांदा प्रश्न बाबत माननीय पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद घेऊन उपोषण करणारा आहेत या उपोषणाचे स्वरूप आमरण उपोषण असे आहे यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना पाठीशी राहून आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आव्हान केले आहे शेतकऱ्याच्या अतिशय महत्त्वाचा प्रश्न असून कांद्याला भाव नसल्यामुळे कांद्याचा खर्चही भागत नाही ही वस्तुस्थिती आहे निसर्गाच्या वेळी पावसामुळे त्यामध्ये भर पडली आहे शेतकरी वर्ग आठवण्यात अडचणीत असल्यामुळे मी आमरण उपोषणास बसलो आहे सोमवारपासून आमरण उपोषण चालू होणार असून याकडे शेतकऱ्यांनी संपूर्ण पाठिंबा देऊन कांदा भाव वाढला पाहिजे अशी मागणी होत आहे.
कांदा प्रश्ना वरती रुपेश ढवण कांदा प्रश्नावर ती शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.सध्या कांद्याला अतिशय कमी प्रमाणात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे,, शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे शेतकरी देशधडीला लागलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कांद्याच्या प्रश्नासाठी वेळोवेळी लढा उभा करणारे वेळप्रसंगी रस्ता रोको उपोषण आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे नेते रुपेश दादा ढवण हे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यव्यपी आंदोलन करण्याच्या भूमिकेत….. सर्व शेतकरी मायबाप जनतेने या लढ्यात सहभागी व्हा ही सर्वांना विनंती…..