ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता लांब जाण्याची गरज उरलेली नाही. पारनेर बस स्टँडसमोरील एचडीएफसी बँकेच्या वर, अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा एका दर्जेदार अकॅडमीची शाखा सुरू करण्यात आली असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी दि. १३ एप्रिल पासून मोफत ‘डेमो लेक्चर्स’चे आयोजन करण्यात आले आहे.अनुभवी शिक्षक आणि डिजिटल क्लासरूम या अकॅडमीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे शिकवणारे शिक्षक हे पारनेरमध्ये आता ‘कोटा, नारायना, अॅलन यांसारख्या भारतातील सुप्रसिद्ध संस्थांमध्ये ८ ते १० वर्षांचा अनुभव असलेले तज्ज्ञ आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित या विषयांसाठी प्रत्येकी दोन तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सुसज्ज वर्गखोल्या आणि डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना कठीण विषय सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर वैयक्तिक लक्ष अकॅडमीमध्ये विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवण्यावर भर दिला जातो. दर आठवड्याला चाचणी परीक्षा घेऊन त्याचा निकाल थेट पालकांच्या ग्रुपवर पाठवला जातो. तसेच दररोजच्या नियोजित होमवर्कमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहते. टाकळी ढोकेश्वर येथील पहिल्या शाखेच्या यशानंतर आता पारनेरमधील दुसऱ्या शाखेतही प्रवेशासाठी पालकांचा ओढा वाढला आहे.यशाची परंपरा आणि मोफत बॅच २०२४-२५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने अल्पावधीतच JEE परीक्षेत उत्तम यश मिळवून आपला ठसा उमटवला आहे. सध्या CET परीक्षेची तयारीही जोरात सुरू आहे. पारनेरसह श्रीगोंदा, शिरूर आणि नगर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी एक वरदान ठरत आहे. येत्या २६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी दिनांक १३ एप्रिल २०२६ पासून एक महिन्याचे ‘फ्री डेमो लेक्चर्स’ सुरू होत आहेत. ग्रामीण व शहरी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी अकॅडमीला भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
संपर्कासाठी पत्ता व फोन: एचडीएफसी बँकेच्या वर, पारनेर बस स्टँड समोर, पारनेर. मोबाईल नंबर: ९८५९६५६३६३