पारनेर तालुका प्रतिनिधी:मुकुंद निघोजकर

राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलरशिप परीक्षा 2025 -26 या परीक्षेची नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर झाली यामध्ये पांढरकरवाडी शाळेचे चार विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले . या परीक्षेत राज्यभरातून विद्यार्थी बसले होते .यामध्ये प्रत्येक वर्गाचे राज्यातून 300 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड केली जाते . यामध्ये आपल्या शाळेच्या चार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी निवड झालेली आहे .
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –

🎖️ अन्वी सुनील गारुडकर, इयत्ता -दुसरी
200 पैकी 192 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा रँक आलेला आहे .

🥉शिवम जालिंदर पांढरकर, इयत्ता – दुसरी
200 पैकी 170 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सोळावा रँक .
