लोणी काळभोर रामदरा रोड 17 जून रोजी लोणी काळभोर येथे लोकशाही दिनानिमित्त आमदार श्री माऊली आबा कटके यांच्या जनता दरबारामध्ये गावातील दोन बहु चर्चित व महत्त्वाच्या कामाची मागणी अतिशय आक्रमक पद्धतीने आमदार प्रांत व तहसीलदार यांच्यासमोर केल्यामुळे आज 19 जून 2025 रोजी त्यांच्याच आदेशाने ताबडतोब रामदारा रोड व कॅनॉल वरील पुलाची पाहणी करण्यासाठी आज पाटबंधारे व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी करून त्यांनी ताबडतोब त्या वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला लवकरच पुलाचे काम सुरू होईल हीच अपेक्षा आहे.
लोणी काळभोर कदम वाकवस्ती हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांना त्यांच्या मूळ गावी सोलापूर व मराठवाड्यातील बांधवांना गावाकडे येण्या जाण्यासाठी (एसटी बस स्टॉप) एसटी थांब्याची व्यवस्था लोणी कॉर्नर येथे व्हावी ही महत्त्वाच्या विषयावर मागणी करून तोही विषय लवकरच मार्गी लागेल अशी हमी आमदार माऊली आबा कटके व अधिकारी यांच्याकडून मिळाली आहे लवकरच ही दोन्ही कामे मार्गी लागावे यासाठी श्री संतोष तात्या बाबुराव भोसले शिवसेना शहर प्रमुख लोणी काळभोर मागणी केली लोणी काळभोर ग्रामपंचायत सरपंच भरत काळभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.