जळकोट ता. तुळजापूर जि धाराशिव येथील शर्मिला परमेश्वर किलजे वय 35 वर्षे यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी ( वार गुरूवार ) दुपारी 04:00 वाजता जळकोट येथील स्वगृही फाशी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणी फाशी घेतल्याने नळदुर्ग पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. त्यामुळे सदर प्रेताची उत्तरीय तपासणी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी ( वार शुक्रवार ) होऊन प्रेत ताब्यात मिळाल्यानंतर अंत्यविधी सकाळी 10:00 वाजता जळकोट ता. तुळजापूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.शर्मिला परमेश्वर किलजे यांना बारा वर्षाच्या आतील तीन लेकरं असल्याने सदर बालके आईविना पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन मुले, एक मुलगी, दिर, जाऊ असा परिवार आहे.