भोकरदन – नगर परिषद हद्दीतील प्रभाकर चौधरी नगर येथील नागरिक गेली दोन वर्षांपासून नळ कनेक्शन ची मांगणी करत होते, अधिकारी वर्ग कोटेशन देत नव्हते, वेळोवेळी पाठपुराव करून, फेब्रुवारी महिन्यात मार्च 2025 पर्यंत नगर परिषद अधिकारी यांनी टॅक्स वसूल करून घेतला,नळ कनेक्शनसाठी अस्वस्त केले, कोटेशन फीस भरण्यात आली, मुख्यकारीधिकारी यांनी 20मार्च 2025पर्यंत काम पूर्ण करण्याचे अस्वाशन दिले होते, 30एप्रिल पर्यंत काम च सुरु केले नाही.
मधल्या काळात संबंधित नागरीत नुसत्या चकरा मारून विनवणी करत होते, कर्मचारी वर्गाकडून वेळोवेळी उडवा उडवी चे उत्तर मिळाली, भावनेसी खेळण्याचं काम कर्मचारी वर्गाणी केले, स्थानिक लोक प्रतिनिधीनी सुद्धा आदेश दिले, त्यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही,नंन्तर काम सुरु केले परंतु पूर्ण केले नाही आजही काम अर्धवट आहे, प्रशासनाच्या होणाऱ्या हलगर्जीपणामुळे, नागरिक पाणी टंचाईस त्रस्त आहे,सद्यस्थित काम अपूर्ण असल्याचे दिसून येते.