संत निळोबाराय पालखी सोहळ्याचे शनिवार दिनांक २१ रोजी दुपारी तीन वाजता श्री क्षेत्र पिंपळनेर ते पंढरपूर प्रस्थान होणार आहे समाधीची व पालखीतील पादुकांची शासकीय महापूजा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते होईल नंतर तीन ते चार पर्यंत प्रस्थानाचे कीर्तन पंढरपूर येथील हरिभक्त पारायण मोहनानंद महाराज वृंदावडेकर यांचे होईल.
पालखीचे प्रस्थान होत असताना रथाची महापूजा व रथाचा नारळ आदरणीय अण्णासाहेब हजारे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून होईल तसेच सदर प्रसंगी जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील संत निळोबाराय पालखी सोहळा बरोबर 67 दिंड्या चालत आहेत त्यापैकी आज कागदपत्रांची पूर्तता केलेल्या 43 दिंड्यांना शासनाने 20000 रुपये प्रत्येकी निधी वर्ग केला आहे शासनाने पालखी सोहळ्यासाठी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप पाण्याचे टँकर 100 फिरते स्वच्छालय ॲम्बुलन्स डॉक्टर पोलीस बंदोबस्त व सर्व सुविधा मोठ्या प्रमाणात संत निळोबाराय पालखी सोहळ्याला दिले आहेत वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी अधीन झाले आहेत आता सर्वजण वाट पाहत आहेत फक्त प्रस्थानाची सदर प्रस्तावना सोहळ्याचा कार्यक्रम आगळावेगळा होणार असून जिल्ह्यातील सर्व वारकरी भाविक भक्त यांना सदर प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संत निळोबाराय संस्थांचे अध्यक्ष अशोकराव सावंत व निळोबारायाचे वंशज व पालखी सोहळा प्रमुख गोपाळ मकाशीर यांनी केले आहे तरी संपूर्ण पिंपळनेरकर ग्रामस्थ या सोहळ्यात व कार्यक्रमात मोठ्या आनंदाने सहभागी होत आहे धन्यवाद.