नुकत्याच न्यू इंग्लिश स्कूल मिडीयम स्कूल घोडोबा निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय मंथन प्रज्ञा परीक्षेत घवघवीत यश मिळवून सत्कार करण्यात आला .
यावेळेस न्यू इंग्लिश स्कूल मिडीयम निघोज बाबासाहेब सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री वसंतराव कवादसाहेब तसेच सचिव श्री शांताराम जी कळसकर तसेच न्यू इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक तसेच स्टाफ यांनी बरीच मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे निकाल लावल्याबद्दल निघोजगावातून व परिसरातून संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थी असल्यामुळे सगळ्या पालकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे विशेषता श्री वसंतरावजी कवाद यांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे त्यांच्याकडे स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांचा सामाजिक सेवेचा वसा लाभला आहे नवोदितनेतृत्व असून त्यांच्याकडे वडिलांप्रमाणेच दृष्टिकोन दूरदृष्टी व समाजसेवेची जाण आहे.