Homeताज्या घडामोडीश्री मुलीकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक व तंत्र विद्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील 128 गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
श्री मुलीकादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक व तंत्र विद्यालय राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयातील 128 गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
श्री मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि तंत्र विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी. दि.26 जून श्री मुलिकादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि तंत्र विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन चे अधक्ष .श्री सचिन पाटील वराळ उपसरपंच श्री ज्ञानेश्वर वरखडे, मा उपसभापती श्री खंडूजी भूकन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री किसनराव घोगरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्री मंगेशजी लाळगे, अप्पाशेठ वराळ, मा.अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती .श्री विलासजी हारदे मा श्री भास्करराव वराळ,पत्रकार सचिन जाधव, माजी विद्यार्थी सुयश वराळ,अक्षय वरखडे,मा श्री सुल्तानभाई सय्यद इ उपस्थित होते,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अंकुश अवघडे ,उप प्राचार्य श्री कैलास मोकळे ,पर्यवेक्षक श्री लक्ष्मण झंजाड व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे,तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशजी लाळगे,माजी उपसभापती श्री खंडूजी भूकन यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यालयातील हुशार व गरजू विद्यार्थाना गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अंकुश अवघडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य विषद केले.यावेळी उच्च माध्यमिक विभागाचे समन्वयक प्रा.किरण पाडळकर ,दारकू खोडदे,अमोल खिलारी व विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री शिवाजी गुंजाळ,श्री राजेंद्र गोरखे ,श्री शिंदे बाबाजी ,श्री धनंजय खोसे,श्रीम सुनताज इनामदार ,श्री महेबूब इनामदार ,श्री प्रवीण आवारी,श्री सुनील औटी ,श्री अरुण काळे , व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.
श्री भास्कर काकडे यांनी प्रास्ताविक केले ,श्री दादासाहेब ठवाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर श्री सबाजी बेलोटे सर,श्रीम पुष्पा वराळ मॅडम यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीम संगीता दिघे मॅडम यांनी आभार मानले.