महेश राजेंद्र यादव निस्वार्थी कष्टाळू व्यक्तीमत्व कल्पना राजेंद्र यादव या मातेच्या पोटी अतिशय गरीब परिवारात जन्म झाल्यावर लहानपणापासून वडिलांचे छत्र हरवून गेल्यावर हालाखीचे कष्टमय जीवन जगत आईच्या संस्कारात आणि मामांच्या गावात वाढलेला होतकरू, प्रामाणिक, हजरजबाबी, सामाजिक क्षेत्राची आवड जोपासलेला, कष्टाळू, गोरगरिबांचे कामे स्वतःच्या हिमतीवर करून देणारा जिद्दी मुलगा याचा आज तुझा वाढदिवस सर्वप्रथम महेश तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं कमी वयातील कार्य पाहिलं तर एखाद्या राजकाराण्याला लाजवेल असेच आहे तुला राजकीय क्षेत्राची आवड नाही परंतु राजकीय क्षेत्रात तू सर्वांना आपलेसे केले आणि तुझी ओळख तुझ्या कामातून कर्तृत्वातून आणि नेतृत्व गुणातून निर्माण केलीस.तू महाविद्यालचा यू आर झालास आणि तुझं नेतृत्वगुण आजपर्यंत दाखवून देत राहिलास.वयाच्या १९ व्या वर्षी तू राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेटलास नव्हे नव्हे तुला २६ जानेवारीच्या दिल्लीतील पथसंचलनात राजपथ येथे राष्ट्रपतीनिंच काय सर्व देशानी तुला मानवंदना दिली सॅल्युट केला इथूनच तुझ्या जीवनाला कार्याला सुरुवात झाली. पुणे विद्यापीठाने तुला अनेक कार्यात गौरविले.
चाकणे सर, इनामदार मॅडम, दुधकवडे सर यांच्या नियोजनाखाली काम करत राष्ट्रीय सेवा योजनेत तू हिरीरीने सहभाग घेऊन अनेक सामाजिक कामे केलीस. पोलीस मित्र म्हणून काम करताना पुणे पिंपरी चिंचवड शहराला तू गणपती उत्सवात ५००० पोलिस मित्र म्हणून महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी उपलब्ध करून देत होतास, या कार्याची दखल पोलिस कमिशनर पोळ साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार श्रीनिवास पाटील माजी राज्यपाल उज्ज्वल निकम यांनी घेतली.
पुणे ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडी सोहळ्यात तू गेली अनेक वर्ष माऊलीच्या सेवेला जात आहेस ही आईच्या संस्कारात वारकरी संप्रदायाचे तुला लाभलेले भाग्य आहे. कोरोना काळात लस मिळत नसताना तू खरातवाडीतील ग्रामस्थांना वाडीत लस मिळावी म्हणून अथक प्रयत्न केले आणि वाडीतील ४०० लोकांना एकाच वेळी वाडीतच लस मिळवून दिली आणि त्याच ही चोख नियोजन तू केलेस या नियोजन पद्धतीचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व ठिकाणी अवलंब केला. आपल्या गावातील ज्या जिल्हा परिषद मराठी शाळेत तू शिकला तिथे अनेक चांगल्या गोष्टी करत आलास शाळेचा परिसर सुंदर हिरवागार दिसावा म्हणून ग्रामस्थ माजी विद्यार्थी या सर्वांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले झाडे लावून दिखावा न करता त्या झाडांना पाणी ठिबक च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेस.गावातील लहान मुलांना भाषणाची आवड व्हावी उद्याचे वक्ते या खरातवाडीच्या भूमीतून तयार व्हावे त्यांना माईक वर चांगले बोलता यावे म्हणून अँम्पलीफायर मशीन माईक स्पीकर तू शाळेला दिले हा तुझा दूरदृष्टीकोन मनाला खूपच आवडला. शाळेतील मुला मुलींना सुखरूप शाळेत जाता यावे वयस्कर लोकांना श्रीगोंद्याला जाता यावे म्हणून वाहतुकीसाठी बस तू मंजूर करण्यासाठी अथक परिश्रम केलेस शाळा सुरू झाल्यात बस लवकरच या मार्गावर चालू होऊन सर्वांची गैरसोय दूर होईल.
गावातील अनेक विषय, अनेक प्रश्न ग्रामपंचायत, तहसील, जिल्हाधिकारी, कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत हाताळताना तू अनेक लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेत गावचे प्रश्न सोडवण्यासाठी तुझं लाख मोलाचं योगदान, मदत या गावाला मिळत आहे याचा मनोमन अभिमान वाटत आहे. तुझ्यावर बिनकामाचे कर्तव्यशून्य लोक अनेक आरोप करत राहतील, तुला चुकीचे ठरवत राहतील, तुला बदनाम केले जाईल पण तू गरीबांना मदत करण्याचे चांगले कार्य करत आहेस ते पुढेही चालू ठेवशील तुझ्याकडून गरजूवंत लोकांना असंख्य अपेक्षा आहेत त्या पूर्ण करून त्यांना समाधान देत राहशील ही अपेक्षा ठेवतो. तुझ्या कार्याची दखल इतिहास आणि भविष्य घेईलच पण तुझ्या कार्याला मी छोट्याश्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला यात काही कमी राहिली असेल ती पुन्हा केंव्हा तरी लिहून काढील. पुनश्च वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.