शिवबा संघटना युवक तालुका प्रमुख व युवा कार्यकर्ते यश जी रहाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने धोत्रे येथे घर तेथे ज्ञानेश्वरी या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाटप करून भागवता चार्य ह.भ. प. बाबा महाराज खामकर यांचे प्रवचन तसेच खिचडी महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी निमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटप करून यश रहाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आध्यात्मिक भावनेचे संगोपन केले.
यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, पारनेर तालुका अध्यक्ष बबन दादा तनपुरे, शिवबा दुर्ग संवर्धन अध्यक्ष राजू भाऊ लाळगे,शांताराम पाडले, आयुब शेख , पत्रकार राम तांबे , मयुर धांबोरे , विशाल भांड , किशोर भांड , ज्ञानदेव राही ज , राहुल राहिंज , आकाश सासवडे , प्रविण आदमाने , महेंद्र नाईकवाडी , ओंकार वाळुंज उपस्थित होते.