दिनांक 23 मार्च 2026 रोजी आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात पार पडले यावेळी शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मधील आदर्श शिक्षक ,आदर्श विद्यार्थी , आदर्श कर्मचारी इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्षभरामध्ये शिक्षक विद्यार्थी यांनी केलेल्या कामानुसार विविध कौशल्य , विकास, उपक्रम संस्था वाढीसाठी कार्य, विद्यार्थ्यांन विषयी आपुलकी या सर्व बाबींचा विचार करून पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे बाबा महाराज खामकर , कृष्णकांत खणकर, चेअरमन प्रा.इंद्रायणी ढोकळे श्री बबनराव नारायण ढोकळे शिक्षण व संशोधन संस्था, संस्थापक अध्यक्ष डॉ. ॲड.बाबासाहेब ढोकळे , विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आदर्श इंग्लिश मेडियम स्कूल खडकवाडी विभाग प्रा. हरीश सेनापती,प्रा.अनिल ढोकळे सर , प्रा.गांगड पौर्णिमा, प्रा.सायली मोढवे,प्रा.महेश लोंढे ,प्रा.रेखा बिचारे, विविध विभागामध्ये प्रा.पुनम फेंगडे भोसरी विभाग.प्रा.अनुजा पाटील सातारा विभाग.प्रा. शांता मोरे हडपसर विभाग.प्रा.देवयानी दिंडे कोल्हापूर विभाग.प्रा.मोहिते नसरापूर विभाग .प्रा. शक्तिप्रसाद इंगळे आदर्श महाविद्यालय.प्रा.सोनल चौधरी बालाजीनगर विभाग.प्रा.सुमेध सरोदे प्रा.सचिन गागरे प्रा.अभिषेक शिंदे यांना आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आवर्तन 2026 चा विशेष पुरस्कार देण्यात आला.आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स भोसरी यांना विशेष पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.