पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे ॲग्री एम पी हायस्कूल जामगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथे इयत्ता पाचवी ते दहावी विद्यालय आहे या विद्यालयाची सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षाचे स्नेहसंमेलन दिनांक 20 मार्च 2026 रोजी संध्याकाळी सहा वाजता पार पडले .त्याप्रसंगी सारोळा अडवाईचे आदर्श सरपंच श्री परसराम गणपत फंड तसेच पारनेर पोलीस स्टेशनचे पीएसआय हंडाळ गावच्या सरपंच सौ पुष्पाताई बाळासाहेब माळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब माळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सोबले व संचालक मंडळ तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सांस्कृतिक मंडळ व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांना सर्व उपस्थित मान्यवरांनी धन्यवाद दिले. विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल दरवर्षी शंभर टक्के असतो आणि विद्यालयाचा टॉपर 90% च्या जवळपास असतो तसेच विद्यालयातील विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरतात याबद्दल पीएसआय हंडाळ यांनी विद्यालयाचे कौतुक केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काशिनाथ फंड सर यांनी सूत्रसंचालन केले याप्रसंगी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गावातील आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग खामकर उपाध्यक्ष गणेश शिंदे सदस्य सागर चौधरी , चत्तर साहेब आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सन 2002 च्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थी यांनी सर्वांना स्नेहभोजन दिले त्यामध्ये गणेश शिंदे पांडुरंग खामकर प्रवीण शिंदे शिवाजी मेहेर रमेश मेहेर यांनी विद्यार्थी व पालक यांना स्नेहभोजना चे आयोजन केले होते .सर्व कार्यक्रमास त्यांनी भरपूर सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार मानले आहे.