Homeताज्या घडामोडीपारनेर पोलीस स्टेशनने केला पारधी समाजावर अन्याय,खोटे गुन्हे दाखल करून केले पारधी समाजाला अटक: पी आय हंडाळ यांना निलंबित करण्याची पारधी कुटुंबाची मागणी
पारनेर पोलीस स्टेशनने केला पारधी समाजावर अन्याय,खोटे गुन्हे दाखल करून केले पारधी समाजाला अटक: पी आय हंडाळ यांना निलंबित करण्याची पारधी कुटुंबाची मागणी
पारनेर तालुक्यातील काळीमा फासणारी घटना सध्या काल घडली आहे ती म्हणजे पारनेर तालुक्यातील माजमपुर राळेगण थेरपाळ येथील पारधी समाजातील काळे व भोसले या पारधी कुटुंबावर पारनेर पोलीस स्टेशनने अन्याय केला आहे .पारनेर तालुक्यामध्ये कुठे काही चोरी झाली, कुठे दरोडा पडला तर या पारधी समाजाला हे पारनेर पोलीस स्टेशन लगेच उचलायला जातात आणि यांच्यावर खोटे केसेस टाकून यांना पारनेरच्या उपकारागृहामध्ये आणून टाकतात त्यांना मारहाण करतात असा हा पाच सहा वर्षांपासून त्रास पाहायला मिळत आहे .कालची ताजी घटना ती म्हणजे कावेरी विशाल काळे व विशाल काळे हे दोघे नवरा बायको आपल्या बाळाला लसीकरणाला घेऊन गेले असता त्या ठिकाणी पोलीस आले व म्हणाले की चोरी झाली आहे ती चोरी तुम्ही केली आहे चार किलो सोनं तुम्ही चोरल आहे असे म्हणून कावेरी चा नवरा विशाल काळे याला पोलिसांनी कोणताही सबूत नसताना उचलून नेले. तसेच पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला माराच्या भीतीने काही नावे सांगायला लावली आणि सर्व कुटुंबाला दुसऱ्या दिवशी उचलून पोलीस स्टेशनला घेऊन आले त्यामध्ये कावेरी विशाल काळे हिची गाडी तसेच तिचा मोबाईल सुद्धा पोलीस स्टेशनला जप्त केला मोबाईल दिला नाही कोणाला फोन करायचे नाही. तसेच कावेरी चा भाऊ याला सुद्धा पोलिसांनी अटक केली कावेरीचे वडील यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली व कावेरी ही महिला असताना हिला सुद्धा पोलीस स्टेशनला घेऊन गेले तिला दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवले अशाप्रकारे या कुटुंबाला अमानुषपणे मारहाण केली पोलीस स्टेशनमध्ये असा हा गंभीर प्रकार काल घडला आहे.पारनेर पोलीस स्टेशनमध्ये जे उपकाराग्रह आहे त्या ठिकाणी खोट्या केसेस दाखल करून व्यक्ती आणले जातात त्यांना अमानुषपणे मारहाण केली जाते खोटे गुन्हे दाखल केले जातात खोटे केसेस त्यांच्यावर दाखल केले जातात त्यांना सांगितले जातात गुन्हे कबूल करायचे नाही तर तुम्हाला एन्काऊंटर मध्ये मारू अशा सुद्धा धमक्या सर्वसामान्य गोरगरिबातील व्यक्तींना आणून दिल्या जातात एकदा पारनेर उपकारागृह मध्ये किती किती व्यक्ती आहेत आणि या उपकारागृहाची सखोल चौकशी झाली पाहिजे जिल्ह्याचे एसपी ,जिल्ह्याचे डी वाय एस पी मी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी जे पोलीस अधिकारी याच्यामध्ये दोषी असेल त्यांना निलंबित करावे असा प्रकार परत घडला नाही पाहिजे .कोणत्याही प्रकारे कोर्टाचा वॉरंट नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे हा कायद्याने गुन्हा आहे एखाद्या व्यक्तीला आपण अटक केल्यानंतर त्याची मेडिकल करणे महत्त्वाचं असतं अटक झाल्यानंतर परत एकदा त्याची मेडिकल करावी लागते तसे या पारनेर पोलीस स्टेशन केले नाही त्यांनी या कुटुंबाला खूप मारहाण केली यांच्या खोटे केसेस खोटे गुन्हे दाखल केली.
कागद रंगवले महिलेचे अंगठ्याचे ठसे घेतले.आणि डायरेक्ट कोर्टामध्ये हजर केलं त्यावेळेस कोर्टाच्या निदर्शनास आलं की या कुटुंबाला पोलीस स्टेशनने मारहाण केली आहे त्यामुळे काल पारनेर पोलीस स्टेशनला कोर्टाने अगोदर या कुटुंबाला मेडिकल करण्यासाठी सरकारी हॉस्पिटल अहिल्यानगर या ठिकाणी पाठवले आहे. आज कोर्ट काय निकाल देईल याकडे सर्व पारनेर तालुक्याचे लक्ष लागलं आहे. एका कुटुंबाला विनाकारण खोट्या गुन्हे दाखल करून खोटे केसेसमध्ये अडकवले जाते हा मोठा गंभीर प्रकार सध्या पारनेर तालुक्यामध्ये घडला आहे पारनेर तालुक्याचा पोलीस स्टेशनचा भोंगळ कारभार सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे पी आय खेडकर यांना स्वतः मीडियावाले भेटायला गेले असता ते स्वतः मीडियावाल्यांना म्हणाले तुम्ही आरोपींना पाठबळ देऊ नका यांच्यावर मोका लागला आहे यांच्यावर दहा-बारा गुन्हे आहेत मग त्यांच्यावर दहा-बारा गुन्हे आहेत तर इतक्या दिवस हे पोलीस स्टेशन झोपलं होतं का? इतके दिवस का त्यांनी या कुटुंबाला उचलले नाही आणि यांच्या कारवाई केली नाही हे विनाकारण या कुटुंबाला त्रास देत आहे कारण जे आरोपी आहे ते मोकाट आहेत फक्त गरिबाला घेऊन यायचं मारहाण करायची खोटे गुन्हे दाखल करायचं हे काम सध्या पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे तसेच पी आय हंडाळ यांना मीडिया वाल्यांनी विनंती केली असता पी आय हंडाळ बोलले तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका नाहीतर तुम्हाला उचलून आपटीन अशी मीडियावाल्यांना सुद्धा यांनी धमकी दिली आहे त्यामुळे हा सर्वात मोठा गंभीर प्रकार काल पारनेर तालुक्यामध्ये घडला आहे दिवसभर सहा वाजेपर्यंत हा कोर्टामध्ये सुद्धा प्रकार पाहायला मिळाला कोर्टाने डायरेक्ट यांना धारेवर धरलं होतं आणि या कुटुंबाची मेडिकल करण्यासाठी अहिल्यानगर सरकारी दवाखाना या ठिकाणी पाठवले आहेत त्यामधील या परिवाराची राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने थेट मुलाखत घेतली आहे त्यावेळी या कुटुंबाने सांगितले आहे की पी आय हंडाळ यांनी अमानुषपणे आम्हाला मारहाण केली आहे आमची गाडी जप्त केली आहे ,आमचे मोबाईल जप्त केले आहे त्यामुळे या पी आय ला निलंबित करावे व आम्हाला न्याय मिळावा असं कुटुंबाने सांगितलं आहे .