तुळजापुर तालुक्यातील मौजे शिरगापुर येथील शेतकरी भिवाजी तात्याराव चव्हाण (वय ५८ वर्ष) हे मंगळवार दि.२७ मे २०२५ रोजी दररोजच्या प्रमाणे शेतीचे कामकाज करीत असताना विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले.भिवाजी तात्याराव चव्हाण हे माळकरी कुटुंबातील अत्यंत सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे होते.
त्यांच्या या अपघाती निधनाने शिरगापुर सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुले मुली भाऊ असा परिवार आहे. मौजे चव्हाणवाडी येथील रामायणाचार्य प्रवचनकार हभप. शिवाजी महाराज चव्हाण यांचे ते मोठे बंधू होते.