शिंगणापूर:येथे हिंदू धर्माच्या श्रद्धास्थानांवर सुरू असलेल्या कथित “घातक भरती” विरोधात शनिशिंगणापूर येथे आज हिंदुत्ववादी संघटनांनी भव्य मोर्चा काढला. शनिदेव संस्थानसमोरील मुख्य रस्त्यावरून हे शक्तिप्रदर्शन शांततेत पार पडले या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, तरुण वर्ग, महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मोर्चादरम्यान “हिंदू मंदिरांमध्ये हिंदूंनाच प्राधान्य हवे”, “धर्माच्या भावना दुखावणाऱ्या नियुक्त्या बंद करा”, “श्रद्धास्थानांवर राजकारण थांबवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला शनी मंदिराच्या समोरील रस्त्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये मादर्शन करताना सागर बेग म्हणाले देशभरातील मोठमोठ्या देवस्थानांतील पुजा विधीसाठी बुकींग करुन एकेका दिवशी शेकडो कोटी रुपये कमावण्याचा या अॅपच्या माध्यमातून मोठा हातखंडा असल्याचे दिसून आले आहे. या अॅपवर शनिशिंगणापूर येथील अन्नछत्र तसेच गोशाळेची व्हिडीओ शुटींग टाकून यात आर्थिक सहभागाची गरज विषद करुन तुम्ही आर्थिक सहयोग दिल्यास शनीदेव प्रसन्न होऊन तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करतील, अशा प्रकारचे आवाहन केले जाते. भाविकांनाही आपण प्रत्यक्षात शनिशिंगणापूरला जाणे शक्य नसल्याने ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून दान दिल्यास अन्नदान किवा गोशाळा किंवा दोन्हीही उपक्रमांत सहभागी होता येईल, या समाधानातून जगभरातील भाविक फक्त भावनेच्या पोटी पाण्यासारखा पैसा पाठवत असल्याचे समोर आले आहे. मात्र अशा प्रकारे जमा झालेल्या पैशातील एक रुपयाही अधिकृतपणे देवस्थानच्या या उपक्रमांसाठी वापरला गेला नसल्याचे वास्तव सागर बेग यांनी या माध्यमातून मांडले आहे.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या आजपर्यंत कित्येक तक्रारी, उपोषणाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते , दिवसांचे संचालक,यांच्याकडून माननीय धर्मादाय आयुक्त , माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री, महसूल मंत्री पालकमंत्री,अहिल्यानगर,यांच्या कडे,दाखल केले आहे परंतु आजपर्यंत सामाजिक कार्यकर्ते यांना न्याय मिळाला नाही. असे असताना आमदार जगताप यांनी उद्गार काढले शनिशिंगणापूर झाकी है शिर्डी अभी बाकी है असे घोषणा देत तरुणांना संघटन होण्याची गरज आहे असेही बोलले. मोर्चा समाप्तीनंतर आयोजकांनी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट व शासनाला निवेदन देत मागण्या मांडल्या. त्यामध्ये अलीकडेच झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेबाबत चौकशी, नियुक्त कर्मचाऱ्यांची पारदर्शकता तपासणे, व हिंदू संस्कृतीशी सुसंगत धोरण आखण्याची मागणी केली. या दरम्यान आमदार संग्राम भैया जगताप यांनी “शनी देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या निवडी धर्माच्या आधारे करायच्या नाहीत, पण श्रद्धेच्या भावना दुखावणाऱ्या कृतींना विरोध करणे आमचा अधिकार आहे,” असे मत जगताप यांनी व्यक्त केले. यामध्ये प्रशासनाने मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता भंग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. यावेळी शनिशिंगणापूर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी हिंदुत्ववादी नेत्यांनी देवस्थान प्रशासनावर सडकून टीका केली सध्या देवस्थान बनावट ॲप घोटाळा कर्मचारी भरती प्रकरण यामुळे शनिश्वर देवस्थान चर्चेत आहे. देवस्थान अवस्थेच्या नावाखाली गेली वर्षानुवर्ष या पद्धतीने भाविकांना लुबाडले आहे त्यामुळे देवस्थानच्या लौकिकास खऱ्या अर्थाने धक्का बसल्याचे बोलले जात आहे मात्र तरीही देवस्थान प्रशासन अद्यापही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताना दिसून येत आहे त्यांच्या प्रामाणिकतेविषयी ग्रामस्थांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे जोशी कोणीही असो त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे सुरू असलेल्या लुटमारीचा पर्दाफाश पावसाळी अधिवेशनात मांडणार. आमदार संग्राम जगताप
आज शनिवार असल्यामुळे शनिशिंगणापूरला येणारे भाविकांची गर्दी असल्याने येथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने शनी भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागला त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एक किलोमीटर अंतरावर वाहने पार्किंग करून भाविकांना पाई शिंगणापूरला यावे लागत होते. मोर्चा समाप्तीनंतर आयोजकांनी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट व शासनाला निवेदन देत मागण्या मांडल्या. त्यामध्ये अलीकडेच झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेबाबत चौकशी, नियुक्त कर्मचाऱ्यांची पारदर्शकता तपासणे, व हिंदू संस्कृतीशी सुसंगत धोरण आखण्याची मागणी केली. या दरम्यान आमदार संग्राम भैया जगताप यांनी “शनी देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या निवडी धर्माच्या आधारे करायच्या नाहीत, पण श्रद्धेच्या भावना दुखावणाऱ्या कृतींना विरोध करणे आमचा अधिकार आहे,” असे मत जगताप यांनी व्यक्त केले. यामध्ये प्रशासनाने मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता भंग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. यावेळी शनिशिंगणापूर मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी हिंदुत्ववादी नेत्यांनी देवस्थान प्रशासनावर सडकून टीका केली सध्या देवस्थान बनावट ॲप घोटाळा कर्मचारी भरती प्रकरण यामुळे शनिश्वर देवस्थान चर्चेत आहे. देवस्थान अवस्थेच्या नावाखाली गेली वर्षानुवर्ष या पद्धतीने भाविकांना लुबाडले आहे त्यामुळे देवस्थानच्या लौकिकास खऱ्या अर्थाने धक्का बसल्याचे बोलले जात आहे मात्र तरीही देवस्थान प्रशासन अद्यापही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताना दिसून येत आहे त्यांच्या प्रामाणिकतेविषयी ग्रामस्थांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे जोशी कोणीही असो त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे सुरू असलेल्या लुटमारीचा पर्दाफाश पावसाळी अधिवेशनात मांडणार. आमदार संग्राम जगताप
आज शनिवार असल्यामुळे शनिशिंगणापूरला येणारे भाविकांची गर्दी असल्याने येथे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने शनी भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागला त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या एक किलोमीटर अंतरावर वाहने पार्किंग करून भाविकांना पाई शिंगणापूरला यावे लागत होते.