राहुरी तालुक्यातील श्री. सुनील पंढरीनाथ गुलदगड राहणार गुलदगड मळा स्टेशन रोड राहुरी बुद्रुक तालुका राहुरी हे राहुरी शिवारात शेतीची मशागतीचे काम करीत असताना त्यांच्या बैलाला विजेचा धक्का लागून जागेवर मृत्यू होण्याची घटना नुकतीच घडलेली आहे .
शेतकऱ्यांच्या शेतामधून गेलेल्या एल. टी लाइन चा कंडक्टर तुटून तो बैलाच्या अंगावर पडला व विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू झालेला आहे असे संशिकतपणे घटनेचे वर्णन करता येईल . वास्तविक पाहता राहुरी तालुक्यातील अनेक एल टी लाइन चे कंडक्टर हे अत्यंत जून झालेले असून यापैकी बहुतांश कंडक्टर हे मुळा प्रवरा इले.को.ऑफ सोसायटीच्या कार्यकाळातील आहेत यामुळे यापुढेही अशी गंभीर अपघात होऊन जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी ही कंडक्टर तातडीने बदलणे आवश्यक आहे .
असे माजी.खासदार प्रसादराव तनपुरे यांनी माननीय कार्यकारी अभियंता महावितरण श्रीरामपूर विभाग यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे की आपण एल . टी लाइनचे जुने झालेले कंडक्टर बदलून कोणत्याही शेतकऱ्याची जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यावी व झालेली दुर्घटना ही दुर्दैवी असून त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी इथून पुढे आपल्या महावितरणच्या निष्काळजी पणामुळे कोणत्याही शेतकऱ्याची आर्थिक,जीवित हानी झाल्यास व कोणाचा बळी गेल्यास तर सर्व जबाबदारी महावितरणाची राहीन असे लेखी पत्राद्वारे महावितरणला कळविण्यात आले आहे.