मुंबई कांदिवली पश्चिम येथील जेष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची अहिल्या रत्न २०२५ करिता निवड अंतिम झाली,असे सकल धनगर समाजाचे अड.विजय गोफणे यांनी भारत कवितके यांना संपर्क करुन सांगितले.रविवार दिनांक ५ आक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह,गंजे पेठ पुणे या ठिकाणी होणाऱ्या सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या दुसऱ्या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते भारत कवितके यांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.धनगर समाजाच्या अनेक प्रश्नांवर लिखाण करून जनजागृती केली आहे, धनगर समाजाची अनेक गाणी भारत कवितके यांनी लिहून युट्यूबवर प्रसारित केली,ती गाणी थोड्याच अवधीत प्रचंड लोकप्रिय झाली आहेत, महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही भागात धनगर समाजाचे आंदोलन असो, उत्सव असो, अधिवेशन असो, भारत कवितके उपस्थित राहून सहभागी होतात,हा पुरस्कार जाहीर होताच भारत कवितके यांनी प्रतिक्रिया दिली की,” मला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, परंतु अहिल्या रत्न पुरस्कार हा माझ्या समाजाने जाहीर केलेला पुरस्कार मला खूप प्रेरणादायी वाटतो, मला खूप आनंद झाला आहे,” जालना येथील दिपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाला त्यांनी प्रत्यक्ष उपोषण स्थळी जाऊन पाठिंबा दिला,या अधिवेशनात धनगर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत.आर्थिक सक्षमीकरण, उद्योगाच्या संधी व गरज, संस्थात्मक निर्मिती, सामाजिक सुधारणा, रुढी परंपरा, विवाह पद्धतीत बदल, प्रबोधन व शैक्षणिक सुधारणा, समाज संघटन, संघटनात्मक संरचना, शाखा कार्यपद्धती, वार्षिक उपक्रम व नियोजन, केडर बांधणी, महिला सक्षमीकरण, चळवळीतील सहभाग, प्रबोधन ,प्रशिक्षण, कुटुंब व्यवस्थापन,आरोग्य,कायदेविषयक प्रगतीच्या वाटा, नेतृत्व निर्मिती काळाची गरज, राजकीय, सामाजिक आर्थिक, सांस्कृतिक, व अन्य स्वरूपाच्या नेतृत्वाचा विकास, एसटी आरक्षण अमंलबजावणी बाबत सध्या ची स्थिती, छत्तीसगड प्रकरणाचे वास्तव, माध्यमातील धनगर समाजाचे स्थान, अडथळे, संधी, माध्यम हाताळणी, व्यवस्थापन व भागिदारी अशा विविध विषयांवर समाजातील विचारवंताचे विचार आणि सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या अनेक कार्यान्वित उपक्रम चे फलित काय आहे ते समाज बांधवांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.या अधिवेशन मध्ये महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अड.विजय गोफणे, गणेश सोनटक्के, सोमनाथ देवकाते, यशपाल रायभोगे,धुळदेव टेळे, गणेश दुगाणे,नरुटे सर,लवटे सर,अड. शिवाजी मदने, महादेव वाघमोडे, संतोष ढवळे, संतोष वरक, रमेश टकले, यशवंत गोवेकर,सौ.अनुजा जानकर, मनिषा दुगाणे, शालीनी शिंदे,रसिका माने, प्रियंका सोनटक्के, अहिल्या गोफणे,स्वाती देवकाते, पूजा सोलनकर,स्वाती लवटे, अर्चना लाळगे, सुरेखा खरात, मनिषा मदने व इतर सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे पुरुष व महिला कार्यकर्ते निमंत्रक आणि आयोजक यांनी धनगर समाजाला दिशा देणार्या धोरणात्मक अधिवेशनात उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.