सध्या कांद्याला अतिशय कमी प्रमाणात कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे,, शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे शेतकरी देशधडीला लागलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या हितासाठी कांद्याच्या प्रश्नासाठी वेळोवेळी लढा उभा करणारे वेळप्रसंगी रस्ता रोको उपोषण आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे नेते रुपेश दादा ढवण हे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यव्यपी आंदोलन करण्याच्या भूमिकेत सर्व शेतकरी मायबाप जनतेने या लढ्यात सहभागी व्हा ही सर्वांना विनंती.
12 ते 14 रुपये भावानं शेतकऱ्याचे कांद्यासाठी खर्च झालेले पैसे सुद्धा वसूल होत नाही अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना बाजार भाव देण्याची गरज असताना सरकार मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही विचार करताना दिसत नाही फक्त इलेक्शन आलं की शेतकरी आठवतो अशी परिस्थिती असताना येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या इलेक्शनला सरकारला याची किंमत मोजावी लागणार आहे हे मात्र नक्की.