राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विश्वासराव आरोटे यांनी गुरुवार दि.१९ रोजी निघोज येथील घरकुलमध्ये राहणारे राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार संपतराव वैरागर यांच्या घरी भेट देऊन त्यांना भेटवस्तू भेट दिल्या सहा दिवसांपूर्वी वैरागर यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाली होती याची माहिती आरोटे सर यांना समजली होती पत्रकार वैरागर यांना फोन करुन त्यांनी त्यांना आधार देण्याचे काम केले होते.आज प्रत्यक्षात निघोज येथे येऊन आरोटे सर यांनी वैरागर कुटुंबाला भेट वस्तू दिल्या तसेच पुन्हा पाणी शिरणार नाही यासाठी लवकरच शासकीय अधिकारी व संबंधितांशी चर्चा करुन कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव आरोटे सर यांनी एका सर्वसामान्य पत्रकार मित्राला दिलासा देण्याचे काम करुन मदत केली आहे.
आरोटे सर धन्यवाद व हार्दिक आभार शुभेच्छुक – पारनेर तालुका पत्रकार संघ, पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ व सर्व पत्रकार मित्र पारनेर तालुका