वृक्षारोपण मासनिमित्त आयोजित कार्यक्रमात मातृस्मृती वनमंदिर परिसरात ‘एक वृक्ष आईसाठी, एक वृक्ष देशासाठी’ या संकल्पनेतून एकूण १८०० देशी वृक्षांची लागवड सुरू करण्यात आली. या उपक्रमात आज दिनांक २३ जून २०२५ रोजी हिवरे बाजारच्या पंचक्रोशीतील सरपंच व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार मधील सर्व उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. यावेळी सोनेवाडी,टाकळी खातगाव,खातगाव टाकळी,हिंगणगाव, हमीदपूर,निंबळक, ईसळक,पिंपळगाव कौडा, पिंपळगाव वाघा, जखणगाव,भोयरे पठार,भोयरे खुर्द,चास,निमगाव वाघा,निमगाव घाणा,दैठणे गुंजाळ, खारेकर्जुने, सारोळा आडवाई, वडगाव आमली ,भाळवणी ,कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर गावाचे सरपंच व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे चेअरमन उपस्थित होते.
सर्व सरपंचाचे व चेअरमनचे हिवरे बाजार ग्रामस्थांतर्फे फेटा बांधून आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास सरपंच विमलताई ठाणगे,चेअरमन छबुराव ठाणगे, व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर (सर),रोहिदास पादीर,अशोक गोहड आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.