निघोज गावचे कार्यसम्राट उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.१० रोजी निघोज व परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवस निमित्ताने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम उपसरपंच वरखडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळी वतीने करण्यात येणार आहे. ही निघोज ग्रामस्थांसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे. वाढदिवस म्हटला की खर्च हा आलाच मात्र आपण आपला वाढदिवस साजरा करताना समाजातील गोरगरीब गरजू घटकांना याचा फायदा होण्याची गरज आहे आणी तेच काम माऊली वरखडे मित्र मंडळ करीत आहे. वाढदिवस निमित्ताने जवळपास १ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचा फायदा होणार आहे. जिल्हा परिषद विद्यार्थी म्हटले की सर्व सामान्य कुटुंबातील असतात आणी हा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. खरोखरच माऊली वरखडे मित्र मंडळाने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यावर्षी सुरू केला त्याबद्दल जनतेच्या वतीने धन्यवाद व हार्दिक आभार अशाप्रकारे वाढदिवस साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे सुरू होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणी तेच काम निघोज गावचे एक कार्यक्षम व कार्यसम्राट उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली वरखडे सुरू करीत आहेत. निघोज आणी परिसरात सर्व लोक आर्थिक सक्षम नाहीत किमान चाळीस टक्के लोकांची परिस्थीती अत्यंत बेताची आहे .
आणी त्याच कुटुंबातील लोकांना या सामाजिक कामाचा फायदा होणार आहे. यानिमित्ताने माऊली वरखडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माता मळगंगा त्यांना उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो तसेच सामाजिक सेवेसाठी माता मळगंगा देवीचा आशीर्वाद सातत्याने मिळो हीच मळगंगा मातेचरणी प्रार्थना