आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे अहिल्यानगर जिल्ह्यातले अतिशय विश्वासू सहकारी रयत शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक , माजी आमदार आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब यांची सदिच्छा भेट आपली माती आपली माणसं आपलाच श्री रुपेश मारुती ढवण*निघोज गाव व पारनेर तालुक्यातील युवा उमलते नेतृत्व रुपेशजी ढवण यांनी नुकतीच पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात माननीय शरदचंद्र पवार यांचे ज्येष्ठ व विश्वासू व्यक्तिमत्व आदरणीय दादाभाऊ कळमकर यांची सदिच्छा भेट घेऊन पंचायत समिती निघोज मधून तिकीट मागणी केली आहे व त्या पद्धतीने आशीर्वाद घेऊन रुपेश ढवण निवडणुकीच्या तयारीला लागले आहे त्यांचा लोकसंपर्क मोठा असून अनेक राजकीय लोकांचा वरदहस्तत्यांना लाभला आहे आदरणीय खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांचाही त्यांना आशीर्वाद आहे त्यांचे गावातील सामाजिक काम मोठे असून ते निघोज येथील श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्टवर सल्लागार म्हणून काम करत आहेत वसंतरावजी कवाद अध्यक्ष बाबासाहेब कवाद पतसंस्था यांचे ते विश्वासू कार्यकर्ते मानले जातात.
त्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला राजकीय लोकनेते कामाला लागले असून त्यासाठी लोकमत आजमावत आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली लोकांच्या विश्वासावर मी निवडणूक लढणार असून जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे असे त्यांनी यावेळी सांगितले अनेक राजकीय नेते निवडणुकीसाठी चाचणी करत आहेत व त्याप्रमाणे कामाला लागले आहे असे दिसते.