नगर शहरातील बागुल पंडुगु सण 11 जुलै ला साजरा होणार
अहिल्यानगर प्रतिनिधी:सागर सब्बन
नगर – पद्मशाली समाजाचा बागुलू पंडुगू सण म्हणजेच बागेचा सण म्हणून गेल्या कित्येक वर्षा पासून आषाड महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेनंतर साजरा केला जातो. याही वर्षी हा सण समाजाने घरटी एक वृक्ष लावून साजरा करावा असे आवाहन मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.
या महिन्यातील 11 जुलै रोजी हा साजरा होत असून पद्मशाली समाजामधील बागुलू पंडूगू हा सण मोठ्या थाटात माटात समाजातील सर्व घटक एकत्र येऊन अहमदनगर शहरातील बालिकाश्रम येथील मंदिरात व तोफखाना भागातील मंदिरात तसेच सावेडी उपनगरातील श्रमिक नगर येथे मोठया उत्साहाने साजरा केला जातो.
या दिवशी पदमशाली समाजातील लोक देवीला साकडे घालून प्रार्थना करून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी तसेच पर्जन्यवृष्टी ही संतुलित प्रमाणात होण्यासाठी व दुष्काळ अगर अतिवृष्टी होऊ नये या साठी व या काळात होणारी रोगराई दूर व्हावी यासाठी देवीला प्रार्थना केली जाते. या सणाला बागेचा सण म्हणून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असून महाराष्ट्र मध्ये ज्या ज्या ठिकाणी पदमशाली समाजातील लोक राहतात त्या त्या ठिकाणी त्यांचे सोयीने हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. तसेच ज्यांना वृक्षारोपण साठी रोपे नसतील त्यांनी मला संपर्क करावे त्यांना विनामूल्य रोपांची व्यवस्था केली जाईल अशी माहिती मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा यांनी दिली.