हरित धाराशिव अभियान अंतर्गत ग्रामपंचायत काटगाव येथे मा जिल्हाधिकारी व मा मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात १५ लाख तर मौजे काटगाव ता तुळजापूर येथे ३ हजार वृक्षांची एकाच वेळी लागवड करण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे नोंद झाले आहे .
आजच्या वृक्ष लागवड अभियानात मौजे काटगाव येथील ग्रामपंचायत सरपंच श्रीमती कोनाले ग्रा प सदस्य सागर पाटील मुकेश शिवशिंगवले सोमनाथ कांबळे कर्मचारी प्रशांत मुळे इरफान शेख गौतम गोरशे नागनाथ बेटकर सीआरपी सौ रेणुका गंगणे आशा कार्यकर्ती हजारे मॅडम व इतर आशा कार्यकर्त्या अंगणवाडी पर्यवेक्षक व कार्यकर्ती जि प प्रा शा प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी तसेच प्रा आ केंद्र येथील वैद्यकीय कर्मचारी गावातील आजी माजी पदाधिकारी पोलीस पाटील सामाजिक कार्यकर्ते योगेश धुते सूर्यकांत जोकार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रशासकीय कर्मचारी म्हणून कृषी पर्यवेक्षक सरडे साहेब कृषी सहायक दूधभाते कृषिसहायक बी बी ननवरे ग्रामपंचायत अधिकारी संजय घोगरे यांच्या उपस्थितीत पार पडले.