Homeताज्या घडामोडीनरहरी जयंती निमित्त देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज आळंदी देवाची ऋषीतुल्य व्यक्तिमत्व नानजी भाई ठक्कर ठाणे वाला यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
नरहरी जयंती निमित्त देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज आळंदी देवाची ऋषीतुल्य व्यक्तिमत्व नानजी भाई ठक्कर ठाणे वाला यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज धर्मशाळा आळंदी देवाची यांच्या धर्मशाळेत नरहरी जयंती निमित्त व श्रावण मासानिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते या आयोजन मध्ये गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट 25 रोजी नानजीभाई ठक्कर ठाणे वाले एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्या कार्याबद्दल नरहरी महाराज सोनार जयंतीचे औचित्य साधून समाजातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला जीवन पुरस्कार मानपत्र व तुकाराम महाराज पगडी देऊन गौरविण्यात आले .
यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉक्टर आरोटे साहेब त्यांचे सर्व सहकारी देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष श्री संजय काळजंटे उपाध्यक्ष बेलेकर व त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ तसेच समाजातील सर्व नाती बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस आपल्या भाषणामध्ये नानजीभाई यांनी मी प्रत्येकाचे देव पाहतो व देवच मला देतो म्हणून मी दान करतो असे सांगितले आतापर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी मंदिर धर्मशाळा हॉस्पिटल वैद्यकीय मदत गरजूंना नदान अशा विविध उपक्रमांनी हातभार लावला आहे यावेळी सर्वांचे आभार सौ तृप्ती संतोषराव टकले सचिव यांनी केले व कार्यक्रम समारोप झाला.