श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्या निमित्त वेदांतचार्य तुकाराम महाराज शास्त्री यांचे प्रेरणेने सुरू झालेल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य दिव्य आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार महाराजांच्या रसाळ मधुर वाणीतून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्ताने कीर्तनरुपी तिसरे पुष्प गुंफताना वडझिरे या शब्दाचा विशेष अर्थ सांगितला.
वड म्हणजे ज्याप्रमाणे वडाच्या पारंब्या पसरत जाऊन त्याचा वटवृक्ष होतो त्याप्रमाणे तुकाराम शास्त्री यांनी लावलेल्या ज्ञानरूपी रोपाचे वटवृक्ष मध्ये रूपांतर झालेले आहे आणि झरे म्हणजे सतत नामस्मरणाचे झरे पाझरत ठेवले. त्याचे फळ म्हणजे आजचा भव्य दिव्य सोहळा आहे.शास्त्र म्हणजे वेद म्हणून शास्त्राने सांगितले ते करावे. मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव आचार्य देवभव या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाने आपले आई-वडील घरी आलेला पाहुणा आणि संत ही देवाची रूपे आहेत म्हणून त्यांची सेवा करा. मांसाहार, मद्यपान करू नका. शास्त्राने सांगितल्याप्रमाणे पापाचे फळ दुःख आहे आणि पुण्याचे फळ सुख आहे त्याप्रमाणे नेहमी माणसाने धर्माचे पालन करून कर्म केले तर सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही आपली भारतीय संस्कृती संस्कृती हे ऋषीमुनींचे रक्त आहे म्हणून प्रत्येकाने विधीपूर्वक जीवन जगावे आपल्या जीवनाचा उद्धार सतत नामस्मरण म्हणजे कामामध्ये काही म्हणा राम राम याप्रमाणे भक्ती व आचरण करून घ्यावा असे हरिभक्त पारायण वेदांत चार्य डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी यांनी आपल्या रसाळ व मधुर वाणीतून सांगितले.